चंद्रपूर – मकोका फरार आरोपी म्हणून घोषित पाच जणांचा शोध रामनगर पोलिस घेत आहेत. चंद्रपूर येथील विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध उद्घोषणापत्र जारी केले आहे. हे आरोपी रामनगर पोलिस ठाण्यातील अपराध क्रमांक 441/2026 मधील आहेत. गुन्हा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमासह इतर कायद्यांतर्गत दाखल आहे. न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 84 अन्वये हा आदेश दिला. आरोपींनी 27 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी न्यायालयात हजर राहणे आवश्यक आहे. (वाळू तस्करिअनवर भद्रावती पोलिसांची कारवाई, वाचा हि बातमी)
मकोका फरार आरोपी : कोणत्या गुन्ह्यात उद्घोषणापत्र?
या गुन्ह्यातील फरार आरोपींमध्ये 1) इमरान बब्बू शेख ऊर्फ इमरान कुरेशी (वय 38 वर्षे, रा. वॉर्ड क्र. 4, नरेश टॉकीज जवळ, गडचांदूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर), 2) सादीक खान नवाब खान ऊर्फ सादीक कुरेशी (वय 39 वर्षे, रा. वॉर्ड क्र. 4, अमलनाला रोड, इरिगेशन कॉलनी, गडचांदूर, ता. कोरपना), 3) वसीम रज्जाक कुरेशी (वय 33 वर्षे, रा. बबलू किराणा दुकानाजवळ, रयतवारी कॉलरी, चंद्रपूर), 4) सोहेल शेख अहमद शेख (वय 23 वर्षे, रा. महागाव, वांकडी, पोस्ट बाम्बरा, जि. कोमरामभीम, तेलंगणा) आणि 5) निजाम हमीद शेख ऊर्फ आवेश कुरेशी (वय 22 वर्षे, रा. वॉर्ड क्र. 4, लक्ष्मी टॉकीजच्या मागे, गडचांदूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे.
सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून तपास यंत्रणेला उपलब्ध झालेले नाहीत. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक असल्याने विशेष न्यायालय (मकोका) तथा अतिरिक्त सत्र न्यायालय, चंद्रपूरचे न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 84 अन्वये उद्घोषणापत्र जारी केले आहे.
त्यानुसार संबंधित पाचही आरोपींनी 27 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी न्यायालयात हजर राहणे आवश्यक आहे. फरार आरोपींचा ठावठिकाणा किंवा त्यांच्याबाबत कोणतीही विश्वसनीय माहिती असल्यास नागरिकांनी रामनगर पोलिस ठाणे, चंद्रपूर येथे माहिती द्यावी, असे चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी कळविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






