Cattle Smuggling MCOCA कारवाई अंतर्गत चंद्रपूर पोलिसांनी गोवंश तस्करी प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली.

Cattle Smuggling MCOCA | चंद्रपुरात गोवंश तस्करांविरोधात पहिली मकोका कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 25, 2026

Cattle Smuggling MCOCA : चंद्रपूर – गोवंश तस्करांची ओळख परेड घेतल्यावर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी आरोपींची ओळख परेड घेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली, जर कारवाईच्या अटींचे उल्लंघन केले तर थेट मकोका अंतर्गत कारवाई करणार असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात संघटित गोवंश तस्करीची गुन्हेगारी करणाऱ्या इमरान बब्बू शेख टोळी विरोधात जिल्ह्यातील पहिली मकोका कारवाई करण्यात आली आहे. (दुकानात जाते म्हणाली आणि घरी परतलीच नाही)

Cattle Smuggling MCOCA मुळे अवैध गोवंश तस्करांमध्ये भीतीचे वातावरण

६ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूल ते चंद्रपूर मार्गावर गस्तीवर असताना तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या दोन ट्र्क थांबविता त्याची झडती घेतली असता त्यामध्ये ६३ मग गोवंश जनावरांना अत्यंत निर्दयपणे बांधले होते, चारा व पाण्याची व्यवस्था न केल्याने त्यामधील २ जनावरे मरण पावली होती.

महाराष्ट्र राज्यातून तेलंगणा राज्यात अवैध गोवंश जनावरांची तस्करी करण्याचे काम इमरान बब्बू शेख व त्याच्या टोळीने सुरु केले होते, गुन्हे शाखेने या प्रकरणी आरोपींवर विविध कलामांव्ये गुन्हे दाखल केले होते. टोळीप्रमुख इमरान बब्बू शेख व त्याचे साथीदार हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. या टोळीने वैयक्तिक व संघटितपणे अवैध गोवंश तस्करीचे काम केले असून त्यांच्यावर एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहे. हि संघटित गुन्हेगारी मोडून काढत पोलीस प्रशासनाने मकोका चा प्रस्ताव तयार करीत मंजुरीकरिता पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर केला होता. Cattle Smuggling MCOCA

२५ मे रोजी पोलीस महानिरीक्षकांनी गोवंश तस्करीच्या पहिल्या मकोका कारवाईच्या प्रस्तावाला मंजुरी दिली, या कारवाईने अवैध गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेख हाशम शेख मौल्ला, वय 27 वर्षे, मोसिन बेग मुबारक बेग, वय 29 वर्षे, शेख अन्सारी अशरफ मिया, वय 30 वर्षे, शेख जुनैद शब्बीर हुसेन, वय 19 वर्षे, समीर खान करीम खान, वय 18 वर्षे यांना अटक केली असून इम्रान बाब्बू शेख, वय 38 वर्षे (टोळी प्रमुख), वसीम रझ्झाक कुरेशी, वय 31 वर्षे, सादिक खान नवाब खान, वय 39 वर्षे, निजाम हमीद शेख, वय 21 वर्षे, सोहेल शेख अहमद शेख, वय 23 वर्षे हे फरार आहे. Cattle Smuggling MCOCA

हि यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, पोउपनि सुरेंद्र उपरे, अरुण खारकर, परवरीश शेख, सुधीर मते व अनिल जामकादम यांनी केली.   

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment