Missing Girl प्रकरणात चिमूर परिसरातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असल्याचे दृश्य.

दुकानात जाते सांगून गेलेली मुलगी परतलीच नाही

User avatar placeholder
Written by Prakash Hande

मे 24, 2026

missing girl : चिमूर – मुलगी दहावी पास झाली, आई-वडिलांनी पुढच्या शिक्षणाकरिता मुलीने महाविद्यालयात प्रवेश घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली, मात्र २२ मे रोजी मुलगी घराबाहेर गेली पण ती परत आलीच नाही. याबाबत आईने चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. (अल्पवयीन मुलीचे शोषण, आरोपी युवकाला अटक)

चिमूरमध्ये अल्पवयीन missing girl झाल्याने कुटुंब चिंतेत

नुकताच दहाव्या वर्गाचा निकाल जाहीर झाला, त्या परीक्षेत १५ वर्षे ११ महिन्याची मुलगी पास झाली, आता पुढील शिक्षण महाविद्यालयात घेण्याची तयारी सुरु होती, कामानिमित्त वडील बाहेरगावी राहतात तर अल्पवयीन मुलगी व भाऊ हे दोघे आईजवळ राहत होते.

२२ मे ला मुलीने दुकानातून काही वस्तू आणायच्या आहेत म्हणून आईला पैसे मागितले, शुक्रवार आठवडी बाजाराचा दिवस असल्याने आईने मुलीला पैसे दिले. मुलगी दुकानात गेली तर आई आठवडी बाजारात निघाली. सायंकाळी ७ वाजता आई घरी आली, घरी मुलगी न दिसल्याने आईने मुलाला विचारणा केली असता ती मैत्रिणीकडे आहे असे सांगितले.

आईने मुलीला कॉल केला, मी मैत्रिणीकडे आहे मात्र ती कोणत्या मैत्रिणीकडे आहे असे न सांगता फोन बंद केला, त्यानंतर मुलगी घरी आलीच नाही, आईने इतरत्र मुलीचा शोध घेतला. मुलगी न मिळाल्याने याबाबत चिमूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने फूस लावत मुलीला पळविले अशी तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करीत मुलीचा शोध सुरु केला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment