Missing Minor Girls प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी आणि ब्रह्मपुरी भागातील बेपत्ता मुलींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

चंद्रपुरात दोन अल्पवयीन मुली बेपत्ता; पोलिसांचा तपास सुरू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

मे 25, 2026

Missing Minor Girls : गोंडपिपरी/ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील गोंडपिपरी व ब्रह्मपुरी तालुक्यातील २ मुली बेपत्ता झाल्याने पालक वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २३ मे रोजी गोंडपिपरी व २४ मे ला ब्रह्मपुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. (चंद्रपूर जिल्ह्यात गोवंश तस्करावर पहिलीच मकोका कारवाई)

गोंडपिपरी आणि ब्रह्मपुरीतील Missing Minor Girls प्रकरणाचा तपास सुरू

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा मध्ये २३ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास १७ वर्षीय मुलगी शौचास बाहेर जायचे म्हणून घरून निघाली, मात्र बराच वेळ झाल्याने मुलगी घरी आली नाही, त्यामुळे आईने शेजारी मुलींबाबत विचारणा केली. मात्र रात्र झाली तरी मुलगी घरी आली नाही. Missing Minor Girls

दुसऱ्या दिवशी २४ मे ला आईने अल्पवयीन मुलीला कुणीतरी फूस लावून पळविले असल्याची तक्रार गोंडपिपरी पोलीस ठाण्यात नोंदवली, पोलिसांनी गुन्हा दाखल करताच तपास सुरु केला.

ब्रह्मपुरी तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी हि घरातील व शेतात कुटुंबासमवेत काम करते, २४ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुलगी म्हणाली कि मला शौचास बाहेर जायचे आहे, असे म्हणत ती बाहेर गेली. मात्र बराच कालावधी लोटल्यावर मुलगी घरी न आल्याने कुटुंब चिंतेत आले.

मुलीची सर्वत्र चौकशी व शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे मुलीच्या आईने ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळविले अशी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment