Chandrapur Missing Minors पोलीस तपास आणि बेपत्ता प्रकरण

चंद्रपूरमध्ये तीन अल्पवयीन मुले बेपत्ता, पालकांची चिंता वाढली

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 13, 2026

चंद्रपूर: Chandrapur Missing Minors प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. एका दिवसात तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्याने नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. रामनगर, राजुरा आणि दुर्गापूर पोलीस ठाण्यांत या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

Chandrapur Missing Minors प्रकरणाचा आढावा

जिल्ह्यातून एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन अल्पवयीन मुले आणि मुली संशयास्पद रित्या बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तींनी या अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (चंद्रपुरात सुगंधित तंबाखूचा कारखाना उघड, LCB ची धाड)

पहिली घटना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे एक १६ वर्षांचा मुलगा अचानक घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. तो बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. बेपत्ता असलेला हा मुलगा रंगाने गोरा, उंची ५ फूट ३ इंच आणि मजबूत बांध्याचा आहे. तो घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या अंगात निळ्या रंगाची सँडो बन्यान आणि काळ्या रंगाचा लोव्हर होता. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस शिपाई महादेव खोब्रागडे करीत आहेत.

दुसरी घटना राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथे एक १३ वर्ष ३ महिने वयाची अल्पवयीन मुलगी दुपारी अचानक घरून निघून गेली. नातेवाईक आणि मैत्रिणींकडे शोध घेऊनही ती न मिळून आल्याने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. बेपत्ता मुलगी रंगाने गोरा, चेहरा लांबट, केस काळे लांब आणि कुरळे असून सडपातळ बांध्याची व ५ फूट २ इंच उंचीची आहे. घरून निघताना तिच्या अंगात पर्पल रंगाची जीन्स पँट, लाल रंगाचा टी-शर्ट आणि पायात निळ्या रंगाचे शूझ होते. राजुरा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास पोलीस हवालदार विनोद कोरवते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

तिसरी घटना दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. येथे राहणारी एक १५ वर्षीय मुलगी सकाळी घरून कोणालाही न सांगता निघून गेली. घरची तपासणी केली असता ती सोबत आपली स्कूलबॅग घेऊन गेल्याचे समोर आले. ती मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलते. रंगाने गोरी आणि सडपातळ बांध्याची असलेल्या या मुलीच्या अंगात घरून निघताना जीन्स पँट आणि टी-शर्ट होता. या प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. एकाच दिवशी जिल्ह्यातून तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment