ब्रह्मपुरी : शाळेत जाते म्हणून घरातून निघालेली एक पंधरा वर्षांची अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Chandrapur Minor Girl Missing घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १० व्या वर्गात शिकणारी पंधरा वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आहे. शाळेत जाते असे सांगून घराबाहेर पडलेली मुलगी सायंकाळी घरी परतलीच नाही. अज्ञाताने फुस लावून पळवल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (हे हि वाचा – एकापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातून ३ मुले बेपत्ता)
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी १० व्या वर्गात शिक्षण घेत असून ती दररोज बसने शाळेत ये-जा करत असे. १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी दप्तर घेऊन घरातून निघाली होती. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गावातील इतर मुली आपापल्या घरी परतल्या, मात्र ही मुलगी घरी न पोहोचल्याने पालकांनी तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस केली. त्यावेळी बसस्थानकावर उतरल्यानंतर मैत्रिणींनी तिला शाळेत सोबत चालण्यास सांगितले असता, ‘तुम्ही चला, मी मागे येते’ असे तिने सांगितले होते; मात्र ती शाळेत पोहोचलीच नाही.
मुलगी घरी न आल्यामुळे आणि तिची सर्व नातेवाईकांकडे शोधघेवाण करूनही कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर तिच्या वडिलांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बेपत्ता मुलीचे वर्णन रंग सावळा, केस काळे आणि उंची ४.५ फूट असून तिच्या अंगात निळसर रंगाचा शालेय सलवार आणि काळ्या रंगाची पायजमा आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक रेखालाल गौतम यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस आरोपीचा व मुलीचा शोध घेत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






