Chandrapur Yuva Sena Entry massive youth joining rally

चंद्रपूरची राजकीय समीकरणे बदलणार! युवासेनेचा ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 15, 2026

चंद्रपूर: Chandrapur Yuva Sena Entry मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारो युवकांनी युवासेनेत प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात ग्रामीण पत्रकार संघाचा जिल्हा मेळावा)

आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात हा ऐतिहासिक सोहळा पार पडत आहे. यामुळे जिल्ह्यात तरुण पिढीमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

विक्रमी संख्येने युवक हाती घेणार युवासेनेचा भगवा

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर आणि ज्वलंत विचारांवर तसेच शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या खंबीर नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो युवकांनी युवासेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे. युवासेना प्रमुख, आमदार मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या विशेष आदेशानुसार, शिवसेना युवासेना सचिव आमदार वरुणजी सरदेसाई साहेब व शिवसेना सचिव सुरजभैय्या चव्हाण जी यांच्या मार्गदर्शनाखाली Gen-Z युवकांचा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात एक ऐतिहासिक व ‘न भूतो न भविष्यती’ असा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. चंद्रपुरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर युवक थेट युवासेनेसोबत जुळत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर या सोहळ्याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

हा भव्य पक्षप्रवेश सोहळा मंगळवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ४:०० वाजता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. या विशेष सोहळ्याचे प्रमुख अध्यक्षपद युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य मा. श्री. हर्षलदादा काकडे भूषवणार आहेत. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्याचे विस्तारक श्री. संदीपजी रियाल पटेल, राजेश नायडू संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख शिक्षक सेना चंद्रपूर विधानसभा प्रमुख श्री. प्रमोद भाऊ पाटील, शिवसेना महानगरप्रमुख श्री. सुरेश भाऊ पचारे, चंद्रपूरचे माजी तालुकाप्रमुख श्री. संतोष भाऊ नरुले, मूलचे माजी तालुकाप्रमुख श्री. प्रशांतभाऊ गट्टूरवार तसेच कोरपनाचे माजी तालुकाप्रमुख डॉ. प्रकाश खनके या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.

चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच तरुण पिढी आणि विशेषतः Gen-Z युवक इतक्या मोठ्या संख्येने एकाच व्यासपीठावर एकत्र येत युवासेनेचा भगवा हाती घेणार आहेत. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, राजूरा आणि बल्लारशाह या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील सर्व युवासैनिक, युवतीसेना, पदाधिकारी आणि शिवसेना प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा ऐतिहासिक करावा, असे आग्रहाचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment