चंद्रपूर – ऊर्जानगर सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रमात संघटनेच्या २६ सभासदांचा गौरव करण्यात आला. रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी स्नेहबंध सभागृह, ऊर्जानगर येथे हा कार्यक्रम पार पडला. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सभासदांचा सन्मान झाला.
वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर आणि चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे प्रमुख पाहुणे होते. संघटनेचे अध्यक्ष राजन भानुशाली यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून पदाधिकारी उपस्थित होते. (चिवड्यात पडली पाल, ७ जणांना विषबाधा, वाचा हि बातमी)
रविवार दिनांक 27 सप्टेंबर 2026 रोजी स्नेहबंध सभागृह ऊर्जानगर येथे पहिल्या सत्रामध्ये संघटनेच्या पदाधिकारी व सभासदाकरिता कामाप्रती जबाबदारी, व कर्तव्य तत्परता वाढावी त्याकरिता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता.
ऊर्जानगर सेवानिवृत्त सत्कार सोहळ्याचे उद्घाटन
दुसऱ्या सत्रामध्ये संघटनेच्या सेवानिवृत्त सभासदांच्या सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रमाचे वनी विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार माननीय श्री संजय भाऊ दरेकर चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संदीप भाऊ गिऱ्हे, व संघटनेचे अध्यक्ष श्री राजनजी ची भानुशाली साहेब यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विधीवत उद्घाटन करण्यात आले.
यामध्ये संघटनेच्या 26 सेवा निवृत्त सभासदांचा शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये शुभेच्छा पर मनोगतामध्ये माननीय आमदार साहेबांनी उत्तम नियोजन व सामाजिक उपक्रमाबद्दल संघटना पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व कर्मचाऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध संपूर्ण शिवसेना पक्ष व स्वतः मी व शिवसेना जिल्हाप्रमुख तुमच्या सदैव पाठीशी राहतील अशी ग्वाही दिली. दुपारी स्नेह भोजना नंतर तिसऱ्या सत्रामध्ये केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करिता नागपूर गेट पर्यावरण चौक ते स्नेहबंध सभागृह पर्यंत भगवे झेंडे व स्वागत बॅनर लावून पूर्ण रस्ता उत्कृष्ट सजवण्यात आला होता, यावेळी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संघटनेचे सरचिटणीस श्री जगदीश रूंदे साहेब,कंत्राटी अध्यक्ष श्री रमेश गणोरकर साहेब,कोषाध्यक्ष रीनेश पिल्ले साहेब ,महापारेषण चे कार्याध्यक्ष श्री प्रवीण पाटील साहेब, महावितरण चे कार्याध्यक्ष श्रीरामकृष्ण चिखलकर,भोसले साहेब, राजेश गाढवे साहेब,सुशांत सावंत साहेब, श्री विजय शास्त्रकार साहेब, श्री पुरुषोत्तम मानकर साहेब,प्रशांत विचारे साहेब, श्री आलोक सोनेकर साहेब, श्री दीपक तायडे साहेब इत्यादी केंद्रीय पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता संघटनेचे महानिर्मिती केंद्रीय कार्याध्यक्ष श्री राहुल भाऊ बेले,श्रीअरुण पोहरे व श्री गजानन कोरडे झोन अध्यक्ष श्री अमोल कोल्हे झोन सचिव श्री शब्बीर शेख,श्री विजय राठोड श्री बाळू चौखंडे,श्री शिवदास घुले, श्री नाना बावणे, श्री सुरेश मेश्राम, श्री जगदीश ढाले, श्री प्रकाश मंगाम,श्री पंकज पाटील, श्री बलराम सिंगर,श्री अमोल विटाले, श्री रोहित पीठ्ठलवार,श्री उमेश आवारी, महिला आघाडी प्रमुख परवीन शेख मॅडम,नेहा भोयर,सोनू झाडे, अश्विनी दडमल असंख्य सभासद प्रामुख्याने उपस्थित होते
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






