वरोरा: वरोरा चिवडा अन्नविषबाधा प्रकरणी सात जणांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस स्टॉप रोडवरील एका चिवडा सेंटरमधून खरेदी केलेल्या चिवड्यात पाल आढळल्याचा आरोप बाधितांनी केला आहे.
सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. अन्न व औषध प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (चंद्रपुरातील रस्ता रोज होतो गायब, वाचा हि बातमी)
वरोरा चिवडा अन्नविषबाधा: नेमकी घटना काय?
वरोरा येथील बस स्टॉप रोडवर, आयटीआय (ITI) लगत असलेल्या प्रसिद्ध ‘मनोज चिवडा सेंटर’मधून खरेदी केलेल्या चिवड्यात पाल आढळल्याने परिसर व शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा चिवडा खाल्ल्यामुळे तब्बल सहा जणांना गंभीर अन्नविषबाधा (Food Poisoning) झाली आहे. या घटनेत माजरी येथील सुवर्णा प्रवीण कोहळे (वय ४५ वर्षे) व प्रवीण शालीकराम कोहळे (वय ५० वर्षे), राळेगाव येथील पंकज दिगंबर आवारी (वय ४० वर्षे) व दिगंबर विठ्ठलजी आवारी, भद्रावती/कोगाव येथील अफजल रफीक अहमदखान, कोरेगाव येथील शेख रेहमान तसेच भद्रावती येथील आयूब सागीर खान यांची प्रकृती खालावली. या सर्व बाधित रुग्णांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात अन्न व औषध विभागाचे अश्या गंभीर घटनांवर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता नागरिक करू लागले आहे, वरोऱ्यातील या चिवडा सेंटरवर नागरिक आवडीने जात होते, मात्र मोठ्या प्रमाणात चिवड्याची विक्री होत असताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. FDA ने अश्या प्रतिष्ठाणची चौकशी करून तातडीने कारवाईचा बडगा उभारावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






