चंद्रपूर / जिवती : Jivati Ashram Shala News चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम जिवती तालुक्यातील नगराळा येथील अमरु नाईक माध्यमिक निवासी आश्रमशाळेत जेवणात पाल पडल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अन्नातून ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.
बाधित विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून ती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. (हे हि वाचा – आरोपीला वाचविण्यासाठी दिले बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र)
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Jivati Ashram Shala News : नगराळा निवासी आश्रमशाळेत घडला धक्कादायक प्रकार
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम जिवती तालुक्यातील नगराळा येथील अमरु नाईक माध्यमिक निवासी आश्रम शाळेत जेवणात पाल पडल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अन्नातून ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून, त्यांना उपचारासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून ती धोक्याबाहेर आहे.
ही आश्रम शाळा इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अखत्यारीत चालवली जाते. या निवासी शाळेत वर्ग १ ते १० पर्यंतचे ५० विद्यार्थी शिक्षण घेतात.
स्वयंपाकघरात डाळभाजी शिजत असताना नकळत पडली जिवंत पाल
१ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी स्वैपाकगृहात जेवण तयार केले जात होते. यादरम्यान शिजत असलेल्या डाळभाजीत नकळत जिवंत पाल पडली. स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना याची अजिबात कल्पना आली नाही.
जेवण सुरू असताना डाळभाजी वाटप करणाऱ्या मुलांना पालीचे लहानमोठे तुकडे अन्नात दिसले. त्यांनी तत्काळ इतर विद्यार्थ्यांना जेवण्यापासून रोखले. काही वेळातच प्रभावित विद्यार्थ्यांना मळमळ व त्रास होऊ लागला.
सर्व विद्यार्थ्यांना प्रथमतः जिवती ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांच्या निर्देशानुसार त्यांना पुढील उपचारासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.
या गंभीर घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशाने ३ मुलींचा झालेला मृत्यू आणि १५ दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळेत घडलेली अत्याचाराची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला आहे.
प्रशासन आश्रम शाळांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. १५ दिवसांपूर्वीच युवासेनेने जिल्ह्यातील निवासी शाळांना आकस्मिक भेटी देण्याबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्देवी घटना घडल्याचा संताप व्यक्त होत आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अन्नाचे नमुने गोळा केले आहेत. कुंभेझरी, पारधी गुडा, नागलोन, नोकेवाडी, पेदा आकसापूर, नगराळा, शंकर लोधी आणि नागपाडा या गावांमधील विद्यार्थी येथे शिकत आहेत. पोलिसांनी आश्रम शाळेच्या अधीक्षकांची चौकशी सुरू केली असून, शाळेतील स्वच्छता आणि गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






