चंद्रपूर – Independence Day Chandrapur निमित्त चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात महापौर संगीता खांडेकर यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवून सलामी देण्यात आली. (हे हि वाचा – चंद्रपुरात युवासेनेचा ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळा)
त्याचप्रमाणे शहरात तिन्ही झोन कार्यालये आणि हुतात्मा स्मारक येथेही ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या गजरात भारत मातेला वंदन केले.
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आज शनिवार १५ ऑगस्ट रोजी चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात मा. महापौर सौ. संगीता खांडेकर यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. त्याचप्रमाणे तिन्ही झोन कार्यालये,हुतात्मा स्मारक येथेही धजारोहण पार पडले.
मा. महापौर यांनी राष्ट्रध्वज फडकवून ध्वजाला सलामी दिली. याप्रसंगी उपस्थितांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांच्या गजरात भारत मातेला अभिवादन केले. शहरातील नागरिकांना संबोधित करताना मा. महापौर सौ.संगीता खांडेकर म्हणाल्या, “स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळेच आज आपण हा अमृतकाळ अनुभवत आहोत. चंद्रपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रगतीशील बनवण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मनपा प्रशासन व नागरिक यांनी खांद्याला खांदा लावून काम करणे गरजेचे आहे.”
या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याला मा. उपमहापौर श्री.प्रशांत दानव, मा. स्थायी समिती सभापती सौ.मनस्वी गिऱ्हे, आयुक्त श्री.अकुनूरी नरेश, सर्व विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक/नगरसेविका, उपायुक्त श्री.संदीप चिद्रावार,उपायुक्त श्री.शेषराव टाले,शहर अभियंता श्री.रवींद्र हजारे,मुख्य लेखाधिकारी श्री.मनोज गोस्वामी,मनपाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






