चंद्रपूर : बिरसा मुंडा जयंती चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उत्साहात साजरी झाली. जनजातीय गौरव दिनानिमित्त आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. त्यांनी पारंपरिक नृत्यातही सहभाग घेतला. आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी जेव्हा हाक द्याल, तेव्हा खंबीरपणे पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बिरसा मुंडा जयंती चंद्रपूर, बिरसा मुंडा यांना अभिवादन; पारंपरिक स्वागत
जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध एल्गार पुकारणारे, अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला आणि आदिवासी समाजाच्या अस्मितेला नवी दिशा देणारे धरती आबा, आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित अभिवादन कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने केलेल्या स्वागताला प्रतिसाद देत त्यांनी त्यांच्या पारंपरिक नृत्यातही सहभाग घेतला. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना अभिवादन करताना आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी अर्थमंत्री व वनमंत्री म्हणून घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, केलेले प्रयत्न आणि भविष्यातील विकासाचा संकल्प त्यांनी मांडला. आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी जेव्हा जेव्हा हाक द्याल, तेव्हा तेव्हा मी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहीन, अशी ठाम ग्वाही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (येणाऱ्या काही महिन्यात मी महापौर, वाचा बातमी)
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा ,चंद्रपूरच्या महापौर संगीताताई खांडेकर आणि भगवान बिरसा मुंडा स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक तुमराम यांच्यासह समितीचे पदाधिकारी, आदिवासी समाजातील मान्यवर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिरसा मुंडा स्मारक समितीचा पुढाकार, बिरसा मुंडा जयंती चंद्रपूर
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भगवान बिरसा मुंडा हे केवळ स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक नव्हते, तर ते आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे, सांस्कृतिक अस्मितेचे आणि संघर्षशीलतेचे प्रतीक होते. ब्रिटिश सत्तेविरुद्ध एल्गार पुकारत त्यांनी जल, जंगल आणि जमिनीवरील आदिवासींच्या हक्कांसाठी ऐतिहासिक लढा उभारला. अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी देशात निर्माण केलेले चैतन्य आणि राष्ट्रभक्तीचा जागर आजही समाजाला प्रेरणा देतो. ‘मेरा जीवन ही मेरा संदेश है’ या भावनेतून त्यांनी आपल्या विचारांचा आणि कृतीचा आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणजे केवळ जयंती साजरी करणे नव्हे, तर त्या विचारांनुसार समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा संकल्प करणे होय.
भगवान बिरसा मुंडा स्मारक समितीच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक साकारण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष प्रा. अशोक तुमराम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन हा संकल्प पूर्णत्वास नेला. या स्मारकाच्या उभारणीच्या संकल्पात आपलाही खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य असल्याची भावना व्यक्त करत आ. मुनगंटीवार यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांचे आणि आदिवासी समाजातील सर्व मान्यवरांचे आभार मानले. हे स्मारक आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे आणि भावी पिढ्यांना भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांची प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
आदिवासी समाजाच्या विकासाबाबत केवळ सहानुभूती व्यक्त करून चालत नाही, तर त्यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडविणारे निर्णय शासनाच्या धोरणांत आणि अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये उतरले पाहिजेत, अशी भूमिका आपण मंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.आदिवासी समाजातील प्रत्येक गरजू कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी शबरी घरकुल योजनेचा लाभ व्यापक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. आदिवासी समाजातील अनेक कुटुंबे शहरांमध्येही वास्तव्यास असल्याने त्यांनाही घरकुलाचा लाभ मिळावा, अशी मागणी पुढे आली. ही बाब लक्षात घेऊन १५ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णयाद्वारे शहरी भागातही शबरी घरकुल आवास योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. ग्रामीण असो वा शहरी, गरजू आदिवासी कुटुंबाच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावे, ही या निर्णयामागील संवेदनशील भूमिका होती, असे आ. मुनगंटीवार म्हणाले.
आदिवासीबहुल ग्रामपंचायतींना ५ टक्के निधी थेट, बिरसा मुंडा जयंती चंद्रपूर
आदिवासीबहुल गावांच्या विकासाला थेट आर्थिक बळ मिळावे आणि ग्रामपंचायती स्थानिक विकासकामांसाठी सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने आदिवासी उपयोजना निधीच्या ५ टक्के निधीचे अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना थेट वितरण करण्याच्या व्यवस्थेला आपल्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात चालना दिली. या निधीमुळे ग्रामपंचायतींना स्थानिक गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार विकासकामे हाती घेण्यासाठी आर्थिक स्वायत्तता मिळाली. गावाच्या विकासाचे निर्णय गावपातळीवर घेण्यास बळ देणारी ही महत्त्वपूर्ण व्यवस्था ठरली.तेंदूपत्ता संकलनासाठी आदिवासी बांधवांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा धोका पत्करून जंगलात जावे लागते. (बिरसा मुंडा जयंती चंद्रपूर)
तेंदूपत्ता संकलकांना ७२ कोटींचा बोनस, बिरसा मुंडा जयंती चंद्रपूर
प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करणाऱ्या संकलकांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी वनमंत्री असताना तेंदूपत्ता रॉयल्टीच्या रकमेतून प्रशासकीय खर्चाची कपात न करता संपूर्ण रक्कम बोनसच्या स्वरूपात संकलकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत ७२ कोटी रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय झाला. जंगलात घाम गाळणाऱ्या आदिवासी बांधवांच्या कष्टांचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय होता.आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, यासाठी नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी शासनामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वसतिगृहांमध्ये मर्यादित प्रवेशक्षमतेमुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत देण्याची व्यवस्थाही करण्यात आली. आदिवासी समाजातील पुढील पिढी शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम व्हावी, हा या निर्णयांमागील दूरगामी विचार होता, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले. (बिरसा मुंडा जयंती चंद्रपूर)
मिशन शौर्यच्या माध्यमातून चंद्रपूरच्या आदिवासी युवकांनी एव्हरेस्ट सर करून जिल्ह्याचा झेंडा जगाच्या सर्वोच्च शिखरावर फडकवला. आदिवासी तरुणांच्या जिद्दीचा आणि पराक्रमाचा हा गौरवशाली वस्तुपाठ आहे. याच तरुणांना जागतिक व्यासपीठ मिळावे आणि २०३६ च्या ऑलिम्पिकमध्ये चंद्रपूरच्या आदिवासी खेळाडूने पदक जिंकून देशाचा तिरंगा उंचावावा, हे आपले स्वप्न असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. यासाठी वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, आधुनिक सुविधा आणि दर्जेदार प्रशिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी खेळाडूंना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. ऑलिम्पिक पदक जिंकलेला खेळाडू जेव्हा चंद्रपुरात परतून भगवान बिरसा मुंडा यांना वंदन करेल, तेव्हा आमचे मिशन खऱ्या अर्थाने पूर्ण होईल, अशी भावोत्कट भावना आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. (बिरसा मुंडा जयंती चंद्रपूर)
गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीतून ऐतिहासिक वारशाचा सन्मान, बिरसा मुंडा जयंती चंद्रपूर
गोंड राजे आणि राणी हिराई यांच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव जपण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीचा आग्रह आपण धरला. विधानसभेत स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीसाठी अशासकीय ठराव मांडल्याची आठवण करून देताना त्यांनी या नावामागील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भूमिका स्पष्ट केली. गोंडवाना संस्कृतीचा अभिमान, सात्विकता, प्रामाणिकता, पराक्रम आणि पर्यावरणप्रेम नव्या पिढीच्या विचारविश्वात रुजावे, ही त्यामागील भावना होती. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांचा उल्लेख करताना त्यांनी आदिवासी समाजातील भगिनी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचणे ही संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रवासातून प्रेरणा घेऊन आदिवासी तरुण-तरुणींनी प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असे आवाहनही आ.मुनगंटीवार यांनी केले.
आदिवासी समाजाच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देणार, बिरसा मुंडा जयंती चंद्रपूर
आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, माझा जन्म आदिवासी समाजात झाला नसला, तरी या समाजाची प्रगती, विकास आणि सन्मान यासाठी कार्य करणे मी माझे कर्तव्य मानतो. आदिवासी समाज प्रामाणिक, पराक्रमी आणि सात्विक आहे. या समाजाच्या सामर्थ्याला योग्य संधी मिळाली, तर तो प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठू शकतो. आदिवासी समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभे राहणे, ही माझी भूमिका आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणासाठी सर्व आदिवासी नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांनुसार समाजाच्या उन्नतीसाठी जेव्हा जेव्हा संकल्प कराल, तेव्हा तेव्हा माझी साथ निश्चितपणे आपल्यासोबत असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (बिरसा मुंडा जयंती चंद्रपूर)
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







