Diesel Shortage पार्श्वभूमीवर सिंदेवाही येथे पोलिसांनी कारमधून २४५ लिटर डिझल जप्त करताना दाखविणारे प्रतीकात्मक दृश्य.

Diesel Shortage | सिंदेवाहीत २४५ लिटर डिझलसह दोघांवर पोलिसांची कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 26, 2026

Diesel Shortage : सिंदेवाही – आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारताला बसला असून सध्या देशाला इंधनसदृश्य टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डिझल टंचाई झाल्याने व खरीप हंगाम असल्याने शेतकऱ्यांना डिझल ची आवश्यकता असल्याने त्यांना वेळेवर इंधनाचा पुरवठा होत नसल्याचे चित्र असून एका शेतकऱ्याने वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरून तब्बल २४५ लिटर डिझल घेत गावाला निघाले होते मात्र वाटेत त्यांना पोलिसांनी अडवीत कारवाई केली. (चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा २ अल्पवयीन मुली बेपत्ता)

सिंदेवाही नाकाबंदीत कारमधून २४५ लिटर डिझल कसे आढळले? Diesel Shortage

नेमकं प्रकरण काय आहे, २६ मे रोजी शिवाजी चौक सिंदेवाही मध्ये पोलिसांच्या नाकाबंदीत मारुती वॅगन कार क्रमांक MH ३२ C ७०५९ हे वाहन सिंदेवाही ते नागभीड मार्गाने जात असताना थांबवित त्याची झडती घेण्यात आली. वाहनातील दोघांना पोलिसांनी नाव विचारले असता ३२ वर्षीय योगेश देवराव पर्वते व्यवसाय शेती राहणार धामणगाव नागभीड व ३८ वर्षीय प्रफुल रामदास मस्के शेती राहणार वाढोणा नागभीड असे त्यांनी सांगितले. Diesel Shortage

वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये २ कॅन मध्ये प्रत्येकी ९० लिटर डिझल, पांढऱ्या कॅन मध्ये ३० लिटर, ३ कॅन मध्ये प्रत्येकी ४०, ३५ व ५० लिटर डिझल असा एकूण २४५ लिटर डिझल आढळून आले. पोलिसांनी दोघांना डिझल बाबत परवाना असल्याचे विचारले असता त्यांनी याबाबत परवाना नसल्याचे सांगितले. सदर डिझल हे वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरून आणल्याचे त्यांनी सांगितले.

अनेकजण डिझल ची साठवणूक करीत असल्याचा प्रशासनाला संशय असून त्यावरून याबाबत पडताळणी सुरु आहे. सिंदेवाही पोलिसांनी योगेश पर्वते व प्रफुल मस्के यांच्यावर कलम ३५(३) बीएनएस २०२३ कलम ३,७ जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या कारवाईत एकूण १ लाख ७३ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment