Ballarpur Assault प्रकरणात बल्लारपूर तालुक्यातील किन्ही गावात महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला झाल्यानंतरचे प्रतीकात्मक दृश्य.

Ballarpur Assault | किन्ही गावात पुतण्याने काकीवर केला कुऱ्हाडीने प्रहार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 26, 2026

Ballarpur Assault : बल्लारपूर – २५ मे रोजी बल्लारपूर तालुक्यातील किन्ही गावात क्षुल्लक कारणावरून पुतण्याने फिर्यादी यांच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला, याप्रकरणी पुतण्याविरुद्ध काकाने बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (मी पत्नीचा खून केला, पोलीस घरी आले आणि चक्रावले)

फिर्यादी ४५ वर्षीय अनिल नानाजी येवले हे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात घराशेजारी अनिल यांचा भाऊ सुनील येवले व त्याचे कुटुंब राहतात. २५ मे रोजी फिर्यादी यांची पत्नी ३६ वर्षीय अर्चना अनिल येवले ह्या घराच्या पायऱ्या पाण्याने धूत होत्या, त्याचे पाणी भावाच्या घरापर्यंत गेल्याने लता सुनील येवले यांनी अर्चना सोबत शिवीगाळी करीत भांडण सुरु केले. Ballarpur Assault

किन्ही गावात पाण्याच्या कारणावरून नेमका वाद कसा झाला? Ballarpur Assault

यावेळी अनिल यांचा पुतण्या प्रज्वल येवले हातात कुऱ्हाड घेऊन माझ्या आईसोबत भांडण का करीत आहे म्हणत त्याने त्या क्षुल्लक वादात उडी घेतली. त्यावेळी अर्चना यांनी मी तुझ्यासोबत भांडण करीत नाही तुझी आई माझ्यासोबत भांडण करीत आहे असे पुतण्या प्रज्वल ला म्हणाली.

तितक्यात प्रज्वल ने काकी अर्चना ला जीवे मारण्याची धमकी देत कुऱ्हाडीचा प्रहार केला, बचावाकरीता अर्चना यांनी आपला हात वर केला, कुऱ्हाडीचा वार थेट अर्चना यांच्या करंगळीला लागला. तितक्यात लता व तिचा मुलगा प्रज्वल ने काकीला होता बुक्क्याने मारहाण करू लागले.

वाद वाढत असताना शेजाऱ्यांनी दोघांचा वाद सोडविला, सदर वादाबाबत अनिल येवले यांना कळताच त्यांनी थेट घर गाठले व पत्नीला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले, अर्चना यांना डोक्याला व हाताला गंभीर मार लागल्याने अनिल येवले यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात प्रज्वल व लता येवले विरोधात तक्रार नोंदवली.

बल्लारपूर पोलिसांनी प्रज्वल व त्याची आई लता येवले वर बीएनएस २०२३ कलम ११५ (२), ११८ (१), ३५२ , ३५१ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment