Flavoured Tobacco Seized कारवाईत सिंदेवाही पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील घरातून सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला.

Flavoured Tobacco Seized | लाटबोरी येथे पोलिसांनी जप्त केला प्रतिबंधित तंबाखू साठा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 25, 2026

Flavoured Tobacco Seized : सिंदेवाही – चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी व साठवणूक करणाऱ्या माफियांवर कारवाई मोहीम सुरु आहे, या मोहिमेअंतर्गत सिंदेवाही पोलिसांनी एकाकडून ३ हजार ८०० रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. आरोपींवर सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (साहेब मी पत्नीचा खून केला, पोलीस पोहोचले आणि बसला धक्का)

सिंदेवाही पोलिसांची प्रतिबंधित Flavoured Tobacco Seized

सिंदेवाही पोलीस गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाली कि एकाने राहत्या घरात सुगंधित तंबाखूची साठवणूक करून ठेवली आहे, माहितीच्या आधारे पोलिसांनी लाटबोरी मध्ये जात ४० वर्षीय प्रवीण खाटुजी मदनकर यांच्या घरची झडती घेतली असता एका प्लास्टिक च्या चुंगडीत होला हुक्का शिशा तंबाखू, ईगल हुक्का शिशा तंबाखू २५ पॉकेट असा एकूण ३ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी प्रवीण मदनकर वर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३, २७५ व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम २६(२) (i), २६ (२) (iv), ३० (२) (a) व ५९ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment