राजुरा ( News३४ ): Rajura Police Action on tobacco अंतर्गत राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी बेकायदेशीर सुवासिक हुक्का, शिशा आणि प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त केली. ही कारवाई जोगापूर फाटा येथे सापळा रचून करण्यात आली. यात १० लाख ११ हजार ९२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. आरोपी अर्जुन तिवारी याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (हे हि वाचा – दाम दुपटीचे आमिष, महिलेने केली १४ लाखांनी फसवणूक)
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध तंबाखू व गुटखा विक्रीविरोधात विशेष मोहीम
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राजुरा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. यादरम्यान, गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH 34 BG 7094 मधून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर सुगंधित तंबाखू व हुक्का साहित्याची वाहतूक केली जात आहे. माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने तत्काळ राजुरा येथील जोगापूर फाटा येथे नाकेबंदी करून संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाला थांबवले.
पंचांसमक्ष वाहनाच्या मागील डाल्याची कसून झडती घेतली असता, त्यामध्ये ५ प्लास्टिक चुंगड्यांमध्ये २५० सीलबंद पाकिटे असलेला ६६,२५० रुपये किमतीचा ‘होला हुक्का-शिशा-तंबाखू’, ४ प्लास्टिक चुंगड्यांमध्ये १६० सीलबंद पाकिटे असलेला ७६,८०० रुपये किमतीचा ‘ईगल हुक्का-शिशा-तंबाखू’, २५,५०० रुपये किमतीची ‘ईगल हुक्का शिशा-तंबाखू’ची ३०० पाकिटे, १५,४०० रुपये किमतीची ‘क्रेज तंबाखू’ची ४४ पाकिटे, ४,५०० रुपये किमतीची ‘व्ही-१ तंबाखू’ची १०० पाकिटे, १०,४७२ रुपये किमतीची ‘महक चैनी प्रीमियम फिल्टर तंबाखू’ची ४७६ पाकिटे, ९,९०० रुपये किमतीचा ‘केसरयुक्त विमल पान मसाला’, ‘रेक्स गोल्ड सुपारी’ असा एकूण २,१०,९२२ रुपये किमतीचा अवैध सुवासिक व सुगंधित तंबाखूजन्य साठा आढळून आला.
पोलीस पथकाने तंबाखूजन्य पदार्थांच्या साठ्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ८ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप (MH 34 BG 7094) असा एकूण १० लाख ११ हजार ९२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी अर्जुन दयाशंकर तिवारी (वय २८ वर्षे, रा. कोठारी, ता. बल्लारशाह, जि. चंद्रपूर) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजुरा पोलिसांच्या दणक्यामुळे अवैध तंबाखू तस्करांचे धाबे dणाणले
सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर तुमराम, पोलीस अंमलदार रामेश्वर चहारे, विक्की निर्वाण, अनुप डांगे, महेश बोलगोडवार, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी पार पाडली. राजुरा पोलिसांच्या या दणकेबाज कारवाईमुळे परिसरातील अवैध तंबाखू व हुक्का तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






