Rajura Tobacco Seizure मध्ये पोलिसांनी १०.४५ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त केला.

राजुरा जोगापूर फाट्यावर १०.४५ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त; दोघांना अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 3, 2026

चंद्रपूर (राजुरा): Rajura Tobacco Seizure प्रकरणात राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई करत जोगापूर फाट्यावरून प्रतिबंधित हुक्का, सुगंधी तंबाखू आणि सुपारीचा १०.४५ लाखांचा साठा जप्त केला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

राजुरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे जोगापूर फाट्या जवळ नाकेबंदी करून प्रतिबंधित हुक्का, सुगंधी तंबाखू आणि सुपारीची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट डिझायर कारला पकडले आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी तब्बल १० लाख ४५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. प्रसाद विनेश गुंडवार (वय ३३ वर्ष, रा. जगन्नाथ बाबानगर, आकाशवाणी रोड, चंद्रपूर) आणि राजेंद्र प्रेमचंद्र गुप्ता (वय २९ वर्ष, रा. अष्टभुजा वॉर्ड, बायपास रोड, चंद्रपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (कौटुंबिक वादात राजुरा तालुक्यात हत्या)

Rajura Tobacco Seizure : राजुरा पोलिसांची मोठी कारवाई

पोलीस स्टेशन राजुराचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथक हद्दीत पेट्रोलींग करत असताना, गोपनीय बातमीदाराकडून एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून प्रतिबंधित अन्न पदार्थांची तस्करी होत असल्याची पक्की माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी तातडीने मौजा जोगापूर फाट्या जवळ नाकेबंदी केली. दरम्यान, संशयास्पद वाटणारी स्वीफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 34 BR 0358) येताना दिसताच पोलिसांनी तिला पंचांसमक्ष थांबवून झडती घेतली.

या झडतीदरम्यान कारमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर प्रतिबंधित साठा आढळून आला. पोलिसांनी या कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय दामोधर कांबळे यांनी राजुरा पोलीस स्टेशन गाठून जप्त केलेल्या मुद्देमालाची सखोल तपासणी केली.

या तपासणीत १ लाख १२ हजार ५० रुपये किमतीचे ‘ईगल हुक्का शिशा-तंबाखू’चे २७० सीलबंद पाऊच, १ लाख ६ हजार रुपये किमतीचे ‘होला हुक्का शिशा-तंबाखू’चे ४०० सीलबंद पाऊच आणि २७ हजार रुपये किमतीचे ‘रजनीगंधा’ सुपारीचे २७०० युनिट्स (५० बॉक्स) आढळून आले. पोलिसांनी या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह वाहतुकीसाठी वापरलेली ८ लाख रुपये किमतीची स्वीफ्ट डिझायर कार असा एकूण १० लाख ४५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय कांबळे यांच्या लेखी फिर्यादीवरून राजुरा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा (अपराध क्रमांक ५८७/२०२६) नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर भविष्यात सुगंधी तंबाखू संदर्भात अशाच प्रकारची कारवाई आढळल्यास त्यांच्यावर थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस देखील फिर्यादीत करण्यात आली आहे.

सदरची धडाकेबाज कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, अनुप डांगे, शफीक शेख, मिलींद जांभुळे, महेश बोलगोडवार, शरद राठोड, रमेश बस्सी, राजीव दुबे आणि अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय कांबळे यांनी संयुक्तरित्या यशस्वी केली. या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध तंबाखू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment