Chandrapur Fraud Case police station investigation and scam update

चंद्रपुरात दामदुप्पट पैशांच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 1, 2026

चंद्रपूर – Chandrapur Fraud Case च्या निमित्ताने चंद्रपूर शहरात दामदुप्पट पैशांच्या आमिषाने नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरच्या बँकेतील स्किममध्ये पैसे गुंतवल्यास अवघ्या काही दिवसांत रक्कम दुप्पट करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याप्रकरणी तब्बल चौदा लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्यामुळे चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास तीव्र केला आहे. (हे हि वाचा – दाम दुप्पटचे आमिष महिलेला २५ लाखांचा गंडा)

मैत्रीच्या ओळखीचा गैरफायदा घेत १४ लाखांची फसवणूक

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी अर्चना सचिन निखाडे या सेंट फ्रान्सिस शाळा चंद्रपूर येथे मागील १५ वर्षांपासून क्लर्क म्हणून काम करत असून, त्यांची ११ वी आणि १२ वीच्या वर्गातील जुनी मैत्रीण विद्या विठ्ठल निमजे हिच्यासोबत २०१४ पासून ओळख होती. सन २०२३ मध्ये गांधी चौकात भेट झाल्यानंतर आरोपी विद्या हिने फिर्यादीकडे आर्थिक परिस्थितीची विचारपूस केली आणि पैशांची जुळवाजुळव करून नागपूरच्या एका बँकेच्या स्किममध्ये टाकल्यास दामदुप्पट पैसे मिळतील अशी लोभसवाणी ऑफर दिली.

सुरुवातीला फिर्यादीने नकार दिला असतानाही आरोपी सतत त्यांच्या घरी येऊन आणि हट्ट धरून दबाव टाकत राहिली, अखेर १४ जून २०२३ रोजी फिर्यादीने आपल्या आई-वडिलांच्या जवळ असलेले १ लाख १० हजार रुपये आरोपीच्या हातात सुपूर्द केले. ठरलेल्या मुदतीत पैसे परत मागितले असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पैसे देण्यास स्पष्ट नकार देत शिवीगाळ केली. नुकतेच २८ जुलै २०२६ रोजी वृत्तपत्रातून व मीडियाच्या माध्यमातून आरोपी विद्या विठ्ठल निमजे हिने अशाच प्रकारे अनेक लोकांची फसवणूक केल्यामुळे तिला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केल्याची बातमी फिर्यादीने वाचली.

चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात १५ ते १६ पीडित आले समोर

त्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली असता तिथे इतरही १५ ते १६ पीडित व्यक्ती भेटल्या, ज्यांची आरोपीने दामदुप्पट आमिष दाखवून फसवणूक केली होती. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, रेखा ललेश्वर पाझनकर यांचे ९ लाख २० हजार, सुनिता राजेश दिकोडवार यांचे ८६ हजार, सुनिता अशोक पाठक यांचे १ लाख २० हजार यांसह इतर १० ते १२ जणांची मिळून एकूण १४ लाख १ हजार रुपयांची घसघशीत फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलमानुसार तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पांडुरंग खंडाईत करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment