घुग्गुस ट्रक आग घटनेनंतर जळालेला कोळसा वाहतुकीचा ट्रक

घुग्गुस ट्रक आग : कोळसा वाहतुकीचा ट्रक जळून खाक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 30, 2026

चंद्रपूर : घुग्गुस ट्रक आग प्रकरणाने चंद्रपूर जिल्ह्यात चर्चेला तोंड फुटले आहे. मुंगोली कोळसा खाणीतून घुग्गुस रेल्वे सायडिंगकडे कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपनीचा ट्रक २९ सप्टेंबरच्या रात्री जळून खाक झाला. ट्रकला आग कशी लागली, हे अद्याप स्पष्ट नाही. चालकाच्या दाव्यानुसार काही युवकांनी ट्रक अडवून आग लावली. मात्र घटनास्थळी असलेल्या इतर चालकांनी शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला आहे. घुग्गुस पोलीस तपास करत असून अफवांवर विश्वास ठेवू नये. (शहरातील बिनबा गेटजवळ अपघात, दोघांचा मृत्यू, वाचा अपघाताची दुर्दैवी घटनेची बातमी)

घुग्गुस ट्रक आग : २९ सप्टेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं?

चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र याठिकाणी कार्यरत उद्योगात बाहेरील कामगारांना रोजगार दिला जात असल्याने स्थानिक बेरोजगारांमध्ये संताप आहे, या वातावरणात मूंगोली कोळसा खाणीतून कोळशाची वाहतूक करण्याचे कंत्राट केवीआरआर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले, २९ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास कोळसा अनलोड करीत परत येत असताना कंपनीच्या ट्र्क ला आग लागली. सदर घटनेबाबत विविध शंका उपस्थित झाल्या असून तक्रार मिळाल्यावर या घटनेचा खुलासा होणार.

यवतमाळ जिल्ह्यातील मुंगोली कोळसा खाणीतून घुग्गुस रेल्वे सायडिंग वर कोळसा नेण्याचे कंत्राट केवीआरआर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले आहे, या कंपनीत जवळपास २० ट्र्क आहे, मात्र त्या ट्र्क वर बाहेरील राज्याचे कामगार वाहन चालक म्हणून काम करतात. २९ सप्टेंबरला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ट्र्क क्रमांक MH-34-CQ-3385 हा मुंगोली खाणीतून घुग्गुस रेल्वे सायडींगकडे निघाला, कोळसा अनलोड करीत ट्र्क परत खाणीकडे जात बैरम बाबा मंदिर जवळ अचानक ट्र्क ला आग लागली. या आगीत ट्र्क जळून खाक झाला.

चालकाचा दावा आणि सहकाऱ्यांचे शॉर्ट सर्किटचे म्हणणे

या घटनेनंतर विविध अफवा उडाल्या असून यामध्ये ट्र्क चालक रमाकांत सिंग गोड यांनी ५ युवकांनी ट्रकची वाट अडवीत ट्रकवर पेट्रोल टाकत आग लावली. मात्र याबाबत पोलिसांनी जाळपोळ झालेल्या ट्र्क मागे केवीआरआर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे २ ट्र्क उभे होते, त्यामधील चालक म्हणाले कि असं काही घडलं असत तर चालक आमच्याकडे आला असता, त्यानंतर हल्लेखोरांनी आमचे ट्र्क सुद्धा जाळले असते. पण तसे काही झाले नाही. शॉर्ट सर्किट मुळे ट्र्क जळू शकतो असा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. या आगीत कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

तर दुसरीकडे स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना कोळसा वाहतुकीचे कंत्राट न देता बाहेर राज्यातील कंपनीला कंत्राट दिल्याने त्या संतापातून हि घटना घडू शकते अशी अफवा व चर्चा सध्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये सुरु आहे. पोलीस तपासानंतर या जाळपोळ चे नेमके कारण स्पष्ट होणार असून घुग्गुस पोलीस यामागील कारणे शोधून काढतीलच, याबाबत कंपनी आज तक्रार दाखल करणार आहे. तोपर्यंत अफवावर विश्वास ठेवू नये.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment