Rajura MCOCA Action अंतर्गत आरोपींवर झालेली पोलीस कारवाई

अखेर खेळ खल्लास! पापा जाधव हत्याकांडातील ५ गुन्हेगारांवर पोलिसांचा सर्वात मोठा वार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 9, 2026

चंद्रपूर / राजुरा: Rajura MCOCA Action अंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनोद ऊर्फ पापा जाधव हत्याकांड प्रकरणात पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राजुरा शहरात भरदिवसा गोळीबार करून ही हत्या घडवून आणली होती. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

राजुरा पोलीस ठाण्याच्या इतिहासातील ही पहिलीच मोक्का कारवाई ठरली आहे. सराईत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. (हे हि वाचा – बंदुकीसह एकाला अटक, ब्रह्मपुरी पोलिसांची कारवाई)

Rajura MCOCA Action : राजुरा पोलिसांची पहिलीच धडक कारवाई

राजुरा शहरात भरदिवसा गोळीबार करून घडवून आणलेल्या खळबळजनक हत्याकांड प्रकरणातील सराईत आरोपींविरुद्ध पोलिसांनी कडक पाऊल उचलले असून त्यांच्यावर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. राजुरा पोलीस ठाण्याच्या इतिहासामध्ये प्रथमच गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA) लावण्यात आल्याने गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दुचाकीवरून आले आणि पिस्तुलातून झाडल्या गोळ्या

सविस्तर वृत्तानुसार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास सोमनाथपूर वार्ड येथील रहिवासी विनोद ऊर्फ पापा जनार्धन जाधव हे राजुरा न्यायालयासमोर असलेल्या किरणकुमार साईला यांच्या नारळ पाण्याच्या दुकानाजवळ आपल्या काही मित्रांसोबत बसलेले होते. त्याच दरम्यान इंदिरानगर, राजुरा येथील आरोपी करण दुर्गराज मेकलवार आणि करण दीपक बावीस्कर हे दोघे तोंडाला दुपट्टा बांधून दुचाकीने घटनास्थळी दाखल झाले. क्षणाचाही विलंब न लावता आरोपी करण दीपक बावीस्कर याने स्वतःजवळील पिस्तुलातून विनोद ऊर्फ पापा जाधव यांच्यावर थेट गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली. या थरारक घटनेनंतर शहरात प्रचंड दहशत पसरली होती. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१), ३(५) सह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून राजुराचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी केवळ प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या आरोपींनाच नव्हे, तर या हत्येचा कट रचणारे, आरोपींना चिथावणी देणारे तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारे इतर साथीदार परवेज सरवर शेख, कार्तिक उमेश खामनकर आणि सौरभ ऊर्फ भुर्जी उमेश खामनकर यांनाही बेड्या ठोकल्या. या आरोपींकडून पोलिसांनी कारवाईदरम्यान तब्बल ३ पिस्तुले (अग्नीशस्त्रे), ३ रिकाम्या मॅग्झिन आणि ६ जिवंत काडतुसे जप्त केली.

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून पोलीस दफ्तरी त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीचे संघटित गुन्हेगारी जाळे समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का कारवाईचा सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी करून विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) १९९९ ची कलमे लागू करण्यास रीतसर मंजुरी दिली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे व पोलीस हवालदार कैलास आलाम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कठोर पावलामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment