राजुरा – Rajura Firing News राजुरा शहरात न्यायालयासमोर भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ३२ वर्षीय विनोद उर्फ पापा जाधव यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणावर प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र गोळी थेट डोक्याला लागल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर राजुरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत अशी माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हे हि वाचा – राजुऱ्यात गाडीच्या आवाजावरून रक्तरंजित घटना)
राजुरा शहरात २४ ऑगस्टला ५.३० वाजताच्या सुमारास न्यायालयासमोरच गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात ३२ वर्षीय पापा उर्फ विनोद जाधव यांचा मृत्यू झाला. गोळीबार करणारे आरोपी यांना राजुरा पोलिसांनी तात्काळ अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास राजुरा न्यायालयासमोर दोन व्यक्ती दुचाकीवरून येऊन पापा ऊर्फ विनोद जाधव यांच्यावर गोळीबार करून पसार झाले. या हल्ल्यात जाधव यांच्या डोक्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. उपचारादरम्यान जाधव यांचा मृत्यू झाला. गोळीबारात मृतक तरुण हा गडचांदूर येथील एका जिम मध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत होता अशी माहिती आहे.
आरोपी हे २० ते २२ वर्षे वयोगटातील आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नेमके कारण पोलीस तपासात समोर येईलच. राजुरा शहरात यापूर्वी अनेकदा गोळीबाराच्या घटना घडल्या आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






