Chandrapur School Hostel Facilities Yuva Sena Collector Memorandum

चंद्रपुरात शासकीय शाळा व वसतिगृहांची दुरवस्था; मूलभूत सुविधा व सुरक्षेसाठी युवासेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 24, 2026

चंद्रपूर: Chandrapur School Hostel Facilities अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासकीय शाळा व वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी युवासेनेने केली आहे. स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे आणि वन्यजीवांपासून सुरक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. प्रशासनाने तातडीने शाळा व वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. (हे हे हि वाचा – चंद्रपूर पोस्ट ऑफिस रक्षाबंधन करणार गोड)

Chandrapur School Hostel Facilities: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी युवासेनेचा पुढाकार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे आणि युवासेना चंद्रपूर विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय शाळा व वसतिगृहांमधील समस्यांवर युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय शाळा तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या वसतिगृहांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅड नॅपकीन आणि सुरक्षेच्या मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करून तातडीने त्रुटींची चौकशी व उपाययोजना करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असल्याने शाळा व वसतिगृहांच्या परिसरात साप, विंचू आणि इतर वन्यजीवांपासून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक ऐरणीवर आला असून, वसतिगृहांमध्ये योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत किंवा नाही याची प्रत्यक्ष पाहणी होणे अत्यंत गरजेचे बनले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा व वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी करावी, तेथील गैरसोयींची चौकशी करून आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना कडक निर्देश द्यावेत, अशी मागणी युवासेनेने केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षा व शैक्षणिक वातावरणाच्या दृष्टीने प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलद कार्यवाही करावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनानंतर प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा व वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

सदर निवेदन युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी महानगर प्रमुख सुरेशभाऊ पचारे, युवासेना शहर प्रमुख सय्यद फरदिन, तालुका प्रमुख सागर गभणे, तालुका समन्वयक पवन उडाके, आरिश शेख, अबरार शेख, सय्यद आकिब, रझा सिद्दिकी, अरशिद शेख, अहफाज शेख, फरहान खान, साहेजान शेख आणि जुनैद शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment