युवासेना उपशहरप्रमुख पदी निवड झालेले राहुल समुंद्र पदाधिकाऱ्यांसह

चंद्रपूर युवासेनेत कुणाला मिळाली उपशहर प्रमुखाची जबाबदारी?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 1, 2026

चंद्रपूर – युवासेना उपशहरप्रमुख पदी चंद्रपूर येथील पंचशील वार्डातील कार्यकर्ते राहुल समुंद्र यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेतर्फे ही नियुक्ती जाहीर झाली. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात संघटन बांधणीसाठी महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सचिव वरुण सरदेसाई आणि विस्तारक संदीप पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. नियुक्तीनंतर झालेल्या कार्यक्रमात अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (जुनी पेन्शन योजना लागू होणार का? मंत्रालयात बैठक, वाचा बातमी)

युवासेना उपशहरप्रमुख पदी राहुल समुंद्र यांची निवड

चंद्रपूर शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेच्या संघटन बांधणीला अधिक वेग आला असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सचिव वरुण सरदेसाई आणि युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून पंचशील वार्ड, चंद्रपूर येथील युवा कार्यकर्ते श्री. राहुल अमर समुंद्र यांची ‘युवासेना उपशहर प्रमुख’ पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या विचारसरणीला आणि उपक्रमांना तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचवून पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी राहुल समुंद्र हे निश्चितच जोमाने आणि प्रभावीपणे कार्य करतील, असा दृढ विश्वास यावेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. या नवीन आणि महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल राहुल समुंद्र यांचे राजकीय, सामाजिक वर्तुळातून तसेच मित्रपरिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन केले जात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही नवीन नियुक्ती जाहीर झाल्यानंतर पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बंटी कमटम, महेश श्रीगिरवार, तालुकाप्रमुख सागर गभणे, उपशहरप्रमुख विवान रामटेके व स्वप्निल पाटील, शहरप्रमुख सय्यद फरदीन यांच्यासह कार्तिक महत्व, आफ्रिद शेख, अक्षय सीरसाट, राज पाचभाई, ऋषि बागडे, अंकित शुक्ला, गणेश राखूडे, रोशन पारोधि आदी प्रमुख युवा सैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या आगमनाने आणि पक्षकार्यामुळे चंद्रपूर शहरातील युवासेनेत नवीन ऊर्जा निर्माण झाली असून आगामी काळात संघटनात्मक कार्य अधिक वेगाने पुढे जाईल, असा आशावाद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment