बल्लारपूर दगडाने हल्ला प्रकरणाचा तपास करणारे पोलीस (प्रातिनिधिक छायाचित्र)

दोन वर्षांचा जुना वाद, रात्री रस्त्यात पुन्हा उफाळला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 2, 2026

बल्लारपूर – बल्लारपूर दगडाने हल्ला प्रकरणात तीन एक्कागेट परिसरात एका २५ वर्षीय युवकावर हल्ला झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. जुन्या वादातून डोक्यात दगड मारल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. ही घटना रविवारी (१ नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात दोन वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. जखमी चेतन भुक्या यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. फिर्यादीच्या तोंडी तक्रारीनुसार बल्लारपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मारोती फुलझेले करीत आहेत. (पैश्याच्या वादातून मारहाण, गुन्हा दाखल, वाचा बातमी)

बल्लारपूर दगडाने हल्ला: तीन एक्कागेट परिसरात नेमके काय घडले?

बल्लारपूर येथील तीन एक्कागेट परिसरात जुन्या वादातून मित्रासोबत दारू पिऊन परतत असताना एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन बाला भुक्या (वय २५, रा. फुलसिंग नाईक वार्ड, बल्लारपूर) असे जखमी फिर्यादीचे नाव असून सोहेल खाँजा सय्यद असे आरोपीचे नाव आहे.

जुन्या वादाची पार्श्वभूमी काय आहे?

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी चेतन भुक्या हा मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतो. फिर्यादी व आरोपी यांच्यात मागील दोन वर्षांपूर्वी एका शुल्लक कारणावरून आपापसात भांडण झाले होते, तेव्हापासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. दरम्यान, १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चेतन हा आपला मित्र गोलू शेख याच्यासह तीन एक्कागेट परिसराजवळ दारू पिण्यासाठी गेला होता. तिथे दोघांनी दारू प्राशन केली आणि रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते दोघे रस्ते मार्गाने आपल्या घरी परतत होते. यादरम्यान, रस्त्यात आरोपी सोहेल खाँजा सय्यद याने त्यांना आवाज देऊन थांबवले.

त्यानंतर आरोपी हा चेतनचा मित्र गोलू शेख याच्याशी बोलत असतानाच अचानक जुन्या भांडणाचा राग मनात धरून चेतनला विनाकारण शिवीगाळ करू लागला. चेतनने त्याला ‘तू मला कशासाठी शिवीगाळ करत आहेस?’ अशी विचारणा केली असता, संतापलेल्या आरोपीने जुन्या वादाचा राग काढून चेतनच्या डोक्यात दगड मारला आणि तेथून पळ काढला. या अचानक झालेल्या हल्ल्यात चेतनच्या डोक्यातून रक्तास्त्राव होऊ लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर त्याच्या मित्राने व त्याने तातडीने बल्लारपूर येथील शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. या प्रकरणी चेतन भुक्या याने दिलेल्या तोंडी तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी आरोपी सोहेल खाँजा सय्यद विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हवालदार मारोती फुलझेले करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “दोन वर्षांचा जुना वाद, रात्री रस्त्यात पुन्हा उफाळला”

Leave a Comment