वरोरा – वरोरा अवैध वाळू वाहतूक प्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री एका ट्रॅक्टरवर कारवाई केली. या कारवाईत ७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. ट्रॅक्टर चालक आणि वाळू मालकावर वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रात्रगस्तीवरील पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर वणी बायपास रोडवरील कटारिया मंगल कार्यालयाजवळ नाकाबंदी करण्यात आली. देशपांडे ग्राउंडजवळ ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता चालकाकडे परवाना नव्हता, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस हवालदार अमोल नवघरे करीत आहेत. (जुना वाद उफाळला, दगडाने हल्ला, वाचा बातमी)
वरोरा अवैध वाळू वाहतूक: पोलिसांना खबर कशी मिळाली?
वरोरा शहरात रात्रीच्या सुमारास अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर वरोरा पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल सात लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि मालकाविरोधात वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील एकनाथ वाभीटकर (वय ३६, रा. तुळाणा, ता. वरोरा) असे पकडण्यात आलेल्या चालकाचे नाव असून स्वप्नील दाते (रा. करंजी, ता. वरोरा) असे या प्रकरणातील वाळू मालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे व पोलीस अंमलदार विशाल राजुरकर हे १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास रात्रगस्त ड्युटीवर असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मौजा तुळाणा रोडकडून वरोरा शहराच्या दिशेने काही इसम आपल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक करीत आहेत. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी वणी बायपास रोडवरील कटारिया मंगल कार्यालयाजवळ पंचांसमक्ष तात्पुरती नाकाबंदी केली. यादरम्यान तुळाणा रोडकडून वरोरा शहराकडे जाणार्या मार्गावर देशपांडे ग्राउंडजवळ एक ट्रॅक्टर येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने ट्रॅक्टर थांबवले. विचारपूस केली असता त्याने आपले नाव सुनील एकनाथ वाभीटकर असल्याचे सांगितले.
घटनास्थळी पंचांसमक्ष ट्रॅक्टरची पाहणी केली असता, ५ लाख रुपये किमतीचा एक सिल्व्हर रंगाचा आयशर ४८५ कंपनीचा ट्रॅक्टर, २ लाख रुपये किमतीची विना नंबरची लाल रंगाची ट्रॉली आणि ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू असा एकूण ७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता चालकाकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले असून, त्याने हा माल मालक स्वप्नील दाते याच्या सांगण्यावरून आणल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त केला असून, चालक सुनील वाभीटकर व मालक स्वप्नील दाते यांनी आपसात संगनमत करून अवैध रेती चोरी केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अमोल मारोती नवघरे करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “वरोऱ्यात वाळू तस्करीवर पोलिसांचा घाव; चालकासह मालकावर गुन्हा”