एकोना माईन्स मारहाण प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोळसा वाहतुकीच्या वादातून सुपरवायझर वर प्राणघातक हल्ला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 2, 2026

वरोरा – एकोना माईन्स मारहाण प्रकरणी वरोरा पोलिसांनी पाच अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडल्याची तक्रार आहे. जखमी मंगेश चव्हाण (२७) हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीत सुपरवायझर आहेत. फिर्यादीनुसार, लाल रंगाच्या कारमधून आलेल्या पाच जणांनी लोखंडी रॉड आणि दांड्यांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्यावर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोळसा वाहतुकीतील वादातून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य पवार करीत आहेत. (वाळू तस्करांवर पोलिसांची कारवाई, वाचा बातमी)

एकोना माईन्स मारहाण: दुपारी स्टॉक परिसरात काय घडले?

वरोरा तालुक्यातील एकोना माईन्स परिसरात कोळसा वाहतुकीच्या वादातून पूर्वद्वेषातून एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉड व दांड्याने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मंगेश दिलीप चव्हाण (वय २७, रा. स्नेहल नगर, अभ्यंकर वार्ड, चंद्रपूर) असे जखमी सुपरवायझरचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी मंगेश चव्हाण हा मागील दोन वर्षांपासून राहुल ठाकूर यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये एकोना माईन्स येथे सुपरवायझर म्हणून नोकरी करतो. एकोना माईन्समध्ये के.जी.एन. ट्रान्सपोर्ट, चट्टा ट्रान्सपोर्ट, ठाकूर ट्रान्सपोर्ट आणि सुलतान ट्रान्सपोर्ट हे सर्वजण कोळसा ट्रान्सपोर्टिंगचे काम करतात. दरम्यान, के.जी.एन. ट्रान्सपोर्ट आणि सुलतान ट्रान्सपोर्ट यांना स्थानिक वरोरा येथील लोकांना काम करू द्यायचे नाही, या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कोळसा वाहतुकीच्या वादाची पार्श्वभूमी

घटना १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. मंगेश चव्हाण हे एकोना माईन्स स्टॉकवरील एका झाडाखाली झोपलेले असताना, त्या ठिकाणी एक लाल रंगाची स्विफ्ट डिझायर कार आली, जिचा नंबर समजू शकला नाही. त्या गाडीतून आलेले पाच अज्ञात व्यक्तींच्या हातात लोखंडी रॉड आणि दांडे होते. त्यापैकी दोघांनी तोंडाला कापड बांधले होते तर तिघांनी बांधले नव्हते. या हल्लेखोरांनी मंगेश चव्हाण यांना शिवीगाळ करत हातातील लोखंडी रॉड व दंड्यांनी हात, पाय, छाती व पाठीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत मंगेश गंभीर जखमी झाले असून त्यांना मुका मार लागला आहे. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मंगेश चव्हाण यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, १८९(२), १९०, १९१(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य अनिल पवार करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “कोळसा वाहतुकीच्या वादातून सुपरवायझर वर प्राणघातक हल्ला”

Leave a Comment