चिनोरा जुगार अड्डा प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेली रोकड आणि पत्ते

घरातच रंगला होता पत्त्यांचा डाव; गुन्हे शाखेची धाड

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 2, 2026

वरोरा – चिनोरा जुगार अड्डा प्रकरणी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने घरात सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगारावर छापा टाकला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, यात सहा जण जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळी ३५ हजार १०० रुपयांची रोकड आणि ५२ पत्ते जप्त केले. ही कारवाई वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिनोरा गावात झाली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचला होता. सर्व सहा जणांवर वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. (एकोना माईन्स मध्ये सुपरवायझरला मारहाण, वाचा बातमी)

चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारधी टोला, चिनोरा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत घरी सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला आहे. या धडक कारवाईत ५२ तासपत्त्यांचा जुगार खेळणारे एकूण सहा जण रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून ३५ हजार १०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

चिनोरा जुगार अड्डा: गुप्त माहितीवरून कशी झाली कारवाई?

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना १ नोव्हेंबर २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, पारधी टोला, चिनोरा येथील विकास काळे याच्या राहत्या घरात काही इसम एकत्र जमून पत्त्यांचा जुगार खेळत आहेत. या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ चिनोरा येथील संबंधित ठिकाणी सापळा रचून धाड टाकली.

या कारवाईदरम्यान राजू शेंडे, विकास काळे (दोघेही रा. पारधी टोला, चिनोरा), कैलास घुमे, आशीष ढोक, उमेश येटे आणि निखिल दानव हे सहा जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी मौकेवर पंचनामा करून त्यांच्या ताब्यातून ३५,१०० रुपये रोख रक्कम आणि ५२ तासपत्ते जप्त केले. या सर्व आरोपींविरोधात वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निभोंरकर, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार प्रफुल गारघटे, रजनीकांत पुठ्ठावार, सचिन गुरनुले, सुभाष गोहोकार, पोलीस अंमलदार सुमित बरडे, विठ्ठल काकडे, पोलीस शिपाई मिलिंद टेकाम आणि दिनेश अराडे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “घरातच रंगला होता पत्त्यांचा डाव; गुन्हे शाखेची धाड”

Leave a Comment