माजरी – माजरी लोखंडी रॉड चोरी प्रकरणाचा प्रयत्न वेकोलि नागलोन खदान परिसरात सोमवारी पहाटे उघडकीस आला. सुरक्षा रक्षकांनी संशयित कारचा पाठलाग करून तिला घेराव घातला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, कारमधील दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. कारमध्ये सुमारे २०० लोखंडी रॉड आढळले. त्यांची किंमत ३५ हजार रुपये आहे. या प्रकरणी माजरी पोलीस ठाण्यात एका आरोपीसह एका अज्ञात साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल आहे. (घरात लपविला सुगंधित तंबाखूचा साठा, वाचा बातमी)
माजरी लोखंडी रॉड चोरी कशी उघड झाली
चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी हद्दीतील नागलोन कोळसा खदान परिसरातून वेकोलिच्या लोखंडी रॉडची चोरी करून पळून जाणाऱ्या एका चोरट्याला सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा झटका बसला आहे. चोरांनी पोलिसांना पाहताच घटनास्थळी कार आणि लाखांमोलाचा मुद्देमाल सोडून पोबारा केला असून, या प्रकरणी माजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षा रक्षकांचा पाठलाग आणि कार जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन संबा लोहकरे (वय ४०, रा. कुचना कॉलनी, भद्रावती) हे वेकोलि नागलोन येथे सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत आहेत. पहाटे सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) कंत्राटी ड्युटीवर असताना, सचिन लोहकरे हे सहकाऱ्यांसोबत शासकीय कारने नागलोन कोळसा खदान परिसरात गस्त घालत होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक संशयित मारुती सुझुकी वरसा कार (एमएच ३१/सीएन ११५३) नागलोन कोळसा खदान चड्डा कंपनीसमोरून वणी-वरोरा मार्गाच्या दिशेने जाताना त्यांच्या निदर्शनास आली. सुरक्षा पथकाने तात्काळ सतर्क होत त्या कारचा पाठलाग केला आणि नागलोन खदान परिसरातच कारला घेराव घालून पकडले.
दरम्यान, पोलिसांची गाडी व सुरक्षा रक्षकांना पाहताच कारमधील चालक आणि त्याचा एक साथीदार कार तिथेच सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. सुरक्षा रक्षकांनी पळून गेलेल्या वाहन आणि कारची पाहणी केली असता, चालकाच्या सीटच्या मागच्या बाजूला वेकोलि कोळसा खदानीचे लहान-मोठे वाकडेतिकडे सुमारे २०० नग लोखंडी रॉड भरलेले आढळले. प्रत्येक रड सुमारे ५ किलो वजनाचा असून, एकूण १००० किलो वजनाच्या या लोखंडी रॉडची किंमत ३५ हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले.
विशेष म्हणजे, पळून गेलेल्या चालकाच्या सीटच्या बाजूला एक काळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल पडलेला होता. त्या मोबाईलच्या स्क्रीनवर असलेल्या मालकाच्या फोटोवरून माजरी कॉलरी येथील राहणारा राकिब सगीर सिद्दीकी (वय २५) याची ओळख पटली. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाने जप्त केलेली कार (किंमत ३५ हजारांचे लोखंडी रॉडसह), आरोपीचा मोबाईल आणि चोरीचा मुद्देमाल माजरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या सुपूर्द केला. या प्रकरणी माजरी पोलिसांनी राकिब सगीर सिद्दीकी व त्याच्या एका अज्ञात साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५) व ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार हरिदास चोपणे पुढील तपास करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






