राजुरा – राजुरा रेती वाहतूक प्रकरणी पोलिसांनी दोन ट्रॅक्टर चालकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाली. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी सास्ती ते कोलगाव मार्गावर पोलिसांनी हे ट्रॅक्टर पकडले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. दोन्ही ट्रॅक्टरमधून विनापरवाना रेतीची वाहतूक सुरू होती. पोलिसांनी वाहने आणि रेती असा एकूण सुमारे सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. (मूल तालुक्यात एकाच दिवशी ४ डीजेवर कारवाई, वाचा बातमी)
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रित्या विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर राजुरा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी सास्ती ते कोलगाव मार्गावर ही संयुक्त व कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राजुरा रेती वाहतूक: सास्ती-कोलगाव मार्गावर पोलिसांचा सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे राजुरा पोलिसांनी सास्ती ते कोलगाव जाणारे रस्ता व वर्धा नदी घाटाकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याच्या टर्निगवर सापळा रचून कारवाई केली. पहिल्या कारवाईत, महिंद्रा ५७५ डीआय ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३४/सीजे-६१ आणि त्याच्या ट्रॉलीमध्ये विनापरवाना व अवैध रित्या रेती भरून नेला जाणारा ट्रॅक्टर पोलिसांना आढळला. पंचांसमक्ष चौकशी केली असता ट्रॅक्टर चालक सुमीत विनोद टेकाम (रा. धोपटाळा, ता. राजुरा) याने हा ट्रॅक्टर मालक दिलीप नानाजी नरड (रा. सास्ती) यांच्या सांगण्यावरून चालवत असल्याचे आणि रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी ३ लाख रुपयांचा ट्रॅक्टर व ५ हजार रुपयांची एक ब्रास रेती असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालक सुमीत टेकाम व मालक दिलीप नरड यांच्याविरोधात राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्या कलमांखाली गुन्हे नोंदवले?
तर दुसऱ्या कारवाईत, त्याच परिसरामध्ये सास्ती ते कोलगाव मार्गावर दुसरा एक महिंद्रा ४१५ डीआय ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३४/बीआर-९२४५ व ट्रॉलीमध्ये अवैध रित्या रेतीची वाहतूक करताना आढळला. पंचांसमक्ष केलेल्या तपासणीत या ट्रॅक्टरचा चालक तथा मालक दिवाकर शंकर कोयाडवार (रा. सास्ती) हा विनापरवाना रेतीची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणी देखील ३ लाख रुपयांचे वाहन व ५ हजार रुपयांची एक ब्रास रेती असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून, चालक-मालक दिवाकर कोयाडवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. राजुरा पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






