Rajura Crime News illegal weapon country made pistol seized by police

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह बल्लारशाहचा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 13, 2026

राजूरा (चंद्रपूर): (Rajura Crime News) शहरातील रामनगर सास्ती येथील कोलगाव रोडवर असलेल्या राम मंदिर परिसरात रविवारी एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर घातक हत्यारासह अटक करण्यात राजुरा पोलिसांना मोठे यश आले आहे. कोणताही गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा व जिवंत काडतूस कमरेला खोचून फिरत असलेल्या या गुंडाला गुन्हे शोध पथकाने (DB) अत्यंत शिताफीने सापळा रचून जेरबंद केले. या धडक कारवाईमुळे राजुरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (लग्न मंडपात राडा, चंद्रपुरात चाललंय तरी काय?)

Rajura Crime News : गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सापळा

शहरातील रामनगर सास्ती येथील कोलगाव रोडवर असलेल्या राम मंदिर परिसरात रविवारी एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर घातक हत्यारासह अटक करण्यात राजूरा पोलिसांना मोठे यश आले आहे. कोणताही गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा व जिवंत काडतूस कमरेला खोचून फिरत असलेल्या या गुंडाला गुन्हे शोध पथकाने (DB) अत्यंत शिताफीने सापळा रचून जेरबंद केले. या धडक कारवाईमुळे राजुरा परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठी गुन्हेगारी घटना वेळेतच टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राजूरा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे (DB) प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे व त्यांचे पथक १२ जुलै रोजी परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्तीवर होते. पेट्रोलिंग दरम्यान पथकाला त्यांच्या अत्यंत विश्वासू गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली, ज्यामध्ये रामनगर सास्ती येथील कोलगाव रोडवरील राम मंदिर परिसरात एक संशयित तरुण अग्नीशस्त्र (बंदूक) बाळगून फिरत असल्याचे सांगण्यात आले. माहितीची गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ दोन पंचांना पाचारण केले आणि मंदिराच्या परिसरात गुप्तपणे सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या त्या इसमाला पोलिसांनी चहूबाजूंनी वेढा घालून जाळ्यात ओढले आणि अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाची कसून चौकशी केली असता, त्याने आपले नाव श्रीराज संग्राम बुरिया (वय २१ ते २२ वर्षे, रा. सरदार पटेल वॉर्ड, बल्लारशाह, जिल्हा चंद्रपूर) असे सांगितले. संशय बळावल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या पॅन्टच्या आतमध्ये कमरेला खोचलेल्या एका प्लास्टिक पिशवीत पोलिसांना लोखंडी बनावटीचे गावठी अग्नीशस्त्र (देशी कट्टा) आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी जप्त केलेल्या सिंगल बॅरलच्या या देशी कट्ट्याला पकडण्यासाठी (हॅन्डग्रीप) लाल व काळ्या रंगाचा कापड गुंडाळलेला होता, ज्याची किंमत १० हजार रुपये असून जप्त केलेल्या पिवळ्या धातूच्या काडतुसावर ‘Kf 12’ असे लिहिलेले होते. पोलिसांनी एकूण १० हजार ५०० रुपयांचा हा घातक मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे.

पोलीस तपासात समोर आले आहे की, अटक करण्यात आलेला आरोपी श्रीराज बुरिया हा एक सराईत गुन्हेगार आहे. तो राम मंदिर परिसरात बेकायदेशीरपणे हा देशी कट्टा आणि काडतूस घेऊन फिरत असताना, नक्कीच एखादा मोठा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी राजूरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या (Arms Act) कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

सदरची उल्लेखनीय आणि धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या कारवाईचे नेतृत्व राजूरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चिचोळकर यांनी केले असून, गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सहाय्यक फौजदार किशोर तुमराम, पोलीस हवादार विस्की निवरण, अनुप डांगे, शफीक शेख, महेश बोलगोडवार आणि रमेश बन्सी यांनी ही यशस्वी कामगिरी फत्ते केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीने हा कट्टा कोठून आणला आणि तो कोणावर हल्ला करणार होता, याचा शोध घेत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment