चंद्रपूर – दुर्गापूर विनयभंग प्रकरणी पोलिसांनी एका घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे. भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या तरुणीने विनयभंगाची तक्रार केली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, ही तक्रार ३१ ऑक्टोबर रोजीच्या घटनेबाबत आहे. तक्रारीनुसार, घरमालकाने परवानगीशिवाय खोलीत प्रवेश करून आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप आहे. पीडितेने नंतर दुर्गापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(१) आणि ३३२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. (वाळू तस्करी, वरोरा पोलिसांनी केला गुन्हा दाखल, वाचा बातमी)
दुर्गापूर विनयभंग प्रकरण: तक्रारीत काय म्हटले आहे?
चंद्रपूर शहरातील दुर्गापूर पोलीस ठाणे हद्दीतील परिसरामध्ये भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका तरुणीच्या खोलीत सकाळी शिरून तिचा विनयभंग केल्याची आणि अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी घरमालकाविरोधात विविध कलमांनुसार गंभीर गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वेकोलि कर्मचारी किसन रामचंद्र गुंजेकर वय ५९ असे आरोपी घरमालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणी ही वर्षभरापासून आरोपी किसन गुंजेकर यांच्याकडे भाड्याने राहत होती. दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या खोलीत गाढ झोपेत असताना, घरमालक किसन गुंजेकर याने तिच्या खोलीत विनापरवानगी आणि अनाधिकृतपणे प्रवेश केला. झोपेत असलेल्या तरुणीजवळ जाऊन त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली आणि ‘मला माझ्या पत्नीकडून कोणतेही सुख मिळत नाही, ती फक्त औषधी घेऊन झोपते’ असे अयोग्य व अश्लील संभाषण सुरू केले. त्यानंतर आरोपीने छेडछाड करत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे घबराट उडालेली तरुणी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत खोलीबाहेर पळाली.
या प्रकारामुळे प्रचंड घाबरलेल्या तरुणीने शेजारीच राहणाऱ्या आपल्या मैत्रिणींच्या खोलीकडे धाव घेत घडलेल्या सर्व प्रकारची माहिती त्यांना दिली. त्यानंतर सर्व जणी मिळून जाब विचारण्यासाठी गेल्यावर आरोपीच्या पत्नीने उलट पीडित मुलींचीच चेष्टा करून ‘ही चांगली गोष्ट आहे’ असे बेजबाबदार व संतापजनक उद्गार काढले. या अनादर आणि अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या व प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या पीडितेने या प्रकरणी थेट दुर्गापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसांनी आरोपी घरमालक किसन रामचंद्र गुंजेकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ७४, ७५(१), ३३२ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील कायदेशीर तपास पोलीस करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “चंद्रपुरात वेकोलि कर्मचाऱ्याचे संतापजनक कृत्य”