वरोरा घरफोडी प्रकरण: वरोरा पोलीस ठाण्याची प्रतिकात्मक प्रतिमा

वरोऱ्यात ४२ तोळे सोने आणि १० लाख रोख लंपास

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 7, 2026

वरोरा – वरोरा घरफोडी प्रकरण शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. तुळाणा रोड परिसरातील एका बंद घराचा कडी-कोयंडा आणि लोखंडी कपाट फोडून अज्ञात चोरांनी सुमारे २६ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, कुटुंब निकाहसाठी मुंबईला गेले असताना ही चोरी झाली. परतल्यावर घराचा दरवाजा उघडा आढळला. वरोरा पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे पुढील तपास करत आहेत. (३ महिलांवर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल, वाचा बातमी)

वरोरा घरफोडी प्रकरण: नेमके काय घडले?

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातून एक मोठी आणि खळबळजनक घटना समोर आली असून, येथील एका बंद घराचा कडी-कोयंडा व लोखंडी कपाट फोडून अज्ञात चोरांनी तब्बल २६ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे शहरात एकच दहशत पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, वरोरा येथील करीमजी विला, हनुमान व्यायाम शाळेशेजारी, तुळाणा रोड येथे राहणाऱ्या समिना अलिअसगर बोहरा (वय २५) यांच्या घरी ही मोठी चोरी झाली आहे. फिर्यादी समिना हिचे नुकतेच बी.ए.एम.एस. डॉक्टरचे शिक्षण पूर्ण झाले असून, येत्या ९ जानेवारी २०२७ रोजी तिचा विवाह मुंबई येथे ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच २३ ऑक्टोबर २०२६ रोजी तिची सगाई झाली होती आणि घरात विवाहाची जोरदार तयारी सुरू होती.

निकाहसाठी कुटुंब मुंबईला गेले होते, वरोरा घरफोडी प्रकरण

दरम्यान, समिनाची जुळी बहीण रुकैया शब्बीर बोहरा हिचा निकाह ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथे असल्यामुळे, बोहरा कुटुंबातील सर्व सदस्य १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता वरोरा येथून मुंबईला गेले होते. त्यानंतर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे साडेतीन वाजता संपूर्ण परिवार मुंबईहून निकाहचा कार्यक्रम आटोपून वरोरा येथील घरी परतला. मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप उघडून अंगणात आल्यावर कुटुंबाने नेहमीप्रमाणे मागील दरवाजातून घरात प्रवेश केला, तेव्हा घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

काय काय चोरीला गेले? वरोरा घरफोडी प्रकरण

हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी आपसात चर्चा करून हॉलमध्ये प्रवेश केला आणि समिनाच्या खोलीत जाऊन पाहिले असता लोखंडी आलमारीचा दरवाजा उघडा व कपडे अस्ताव्यस्त पडलेले आढळले. कपाटाचा लॉकर उघडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरांनी लांबवल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी घरातून सुमारे ४२ तोळे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यामध्ये नवीन सोन्याचे नेकलेस, विविध प्रकारच्या पाटल्या, बांगड्या, अंगठ्या, ब्रेसलेट, चैन व कर्णफूलांचा समावेश आहे, तसेच सुमारे २० ग्रॅम वजनाची चांदी आणि कपाटात ठेवलेली तब्बल १० लाख २४ हजार रुपयांची रोकड असा एकूण २६ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

वरोरा घरफोडी प्रकरण, कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल?

लग्नाच्या तोंडावरच घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्यामुळे बोहरा कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या प्रकरणी समिना बोहरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(ए) नुसार अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश काशीनाथ मोरे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment