कोठारी देशी दारू जप्त केलेला देशी दारूचा ट्रक आणि पेट्या

कोठारी देशी दारू जप्त: ३९ पेटी दारूसह १५ लाखांचा ट्रक पोलिसांच्या ताब्यात; चालक अंधारात फरार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 7, 2026

कोठारी – कोठारी देशी दारू जप्त करण्याची मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन कोठारीच्या संयुक्त पथकाने केली. बल्लारशाह-कोठारी मार्गावर अवैध दारू वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. (5 लाखांची लाच, तडजोड 3 लाखांवर, एसीबीचा सापळा)

या कारवाईत ३९ पेटी देशी दारू आणि वाहन असा एकूण १६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. पोलिसांची चाहूल लागताच चालक ट्रक सोडून पळून गेला.

गोपनीय माहितीवरून बल्लारशाह-कोठारी रोडवर सापळा, कोठारी देशी दारू जप्त

स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन कोठारीच्या पथकाने संयुक्तरीत्या धडक कारवाई करत बल्लारशाह-कोठारी मार्गावर अवैध देशी दारूची वाहतूक करणारा एक ट्रक जप्त केला आहे. या कारवाईत ३९ पेटी देशी दारू आणि वाहन असा एकूण १६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांची चाहूल लागताच ट्रक चालक वाहन जागेवरच सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला.

कोठारी देशी दारू जप्त,पाठलाग करूनही चालक अंधारात फरार

मिळालेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस स्टेशन कोठारी हद्दीत अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बल्लारशाह-कोठारी रोडवरील सातबारा हॉटेलजवळ स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कोठारीच्या पथकाने संयुक्तरीत्या सापळा रचून नाकाबंदी केली. दरम्यान, संशयित ट्रक क्रमांक MH34AB5592 तेथे आला असता पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच चालकाने ट्रक न थांबवता भरधाव वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काही अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर चालकाने थोड्या अंतरावर ट्रक थांबवला आणि संधी साधून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी पळून गेलेल्या ट्रक चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन कोठारी येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

रॉकेट संत्रा देशी दारूच्या ३९ पेट्या, कोठारी देशी दारू जप्त

या कारवाईदरम्यान रॉकेट संत्रा कंपनीची देशी दारूच्या ३९ पेट्या ज्यामध्ये एकूण ३९०० नग (प्रत्येक ९० एमएल) असून त्याची किंमत १,५६,००० रुपये आहे, तसेच १५,००,००० रुपये किमतीचा ट्रक क्रमांक MH34AB5592 असा एकूण १६,५६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर यशस्वी कारवाई उपविभाग राजुरा पथक आणि पोलीस स्टेशन कोठारी यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत आणि पळून गेलेल्या चालकाचा कसून शोध घेतला जात आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment