विरूर – चंद्रपूर जिल्ह्यात राजकारणातील अनेक पदाधिकारी हे वाळू चोरीचा व्यवसाय करीत आहे, हि वाळू चोरी अनेकांना आर्थिक नियोजन करीत सुरु आहे, अश्याच एका अवैध वाळू वाहतूक प्रकरणी शिवसेना शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर यांचे नाव समोर आले आहे. विरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक सुरु असताना पोलिसांनी वाहनाला थांबविता झडती घेतली, त्यामध्ये ९ ब्रास रेती आढळून आली. वाळू वाहतुकीबाबत चालकाकडे अधिकृत शासन परवानगी नव्हती, चालकणे ट्र्क मालक शैलेश केळझरकर यांच्या सांगण्यावरून वाळू नेत असल्याची कबुली दिली. (सासऱ्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, वाचा हि बातमी)
अवैध वाळू वाहतूक: धानोरा आर्वी टी पॉईंटवर काय घडले?
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत रेतीची अवैध वाहतूक करणारी एक हायवा गाडी पकडण्यात आली आहे. याप्रकरणी विरुर पोलिसांनी वाहन चालक आणि मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून तब्बल तीस लाखांहून अधिक मूल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, विरुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड आणि त्यांच्या पथकाने मंगळवार दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धानोरा आर्वी टी पॉईंट परिसरात सापळा रचून नाकाबंदी केली होती. दरम्यान, आर्वीकडून विरुरच्या दिशेने येणाऱ्या एका संशयित हायवा गाडीला (क्र. MH34BZ9950) पोलिसांनी थांबवले आणि वाहन चालकाची विचारपूस केली. यावेळी चालकाने आपले नाव दत्ता दशरथ मेश्राम (वय २६, रा. बाबुपेट, चंद्रपूर) असल्याचे सांगितले. पंचांसमक्ष या हायवा वाहनाची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात रेती भरलेली आढळून आली.
परवाना नसल्याने ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी वाहन चालकाकडे रेती वाहतुकीबाबतचा परवाना व कागदपत्रे मागितली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे समोर आले. या कारवाईदरम्यान हायवा गाडीमध्ये ९ ब्रास रेती अंदाजे २७ हजार रुपये किंमतीची आणि ३० लाख रुपये किंमतीची हायवा गाडी असा एकूण ३० लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान चालक दत्ता मेश्राम याने ही रेती राजुरा तालुक्यातील तीर्थरूप नगर तुकूम, चंद्रपूर येथील हायवा मालक शैलेश अशोक केळझरकर (वय ३९) याच्या सांगण्यावरून भरून नेत असल्याचे कबूल केले.
अवैध रित्या रेतीची वाहतूक करून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विरुर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक दत्ता दशरथ मेश्राम आणि वाहन मालक शैलेश अशोक केळझरकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) २०२३ च्या कलम ३(५), ३०३(२) आणि ४९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मंगला पांढुरंग मेश्राम करत असून, परिसरातील रेती चोरांचे धाबे या धडक कारवाईमुळे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






