चंद्रपूर – शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याचा आरोप करत चंद्रपुरात युवासेनेने निषेध आंदोलन केले. चंद्रपूर युवासेना आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाले. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यभर निषेधाची भूमिका घेतल्याचे आंदोलकांनी सांगितले.
शायना एनसी निषेध: वादाची पार्श्वभूमी, चंद्रपूर युवासेना आंदोलन
शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी फोटो फाडून त्यांचा घोर अपमान केल्याच्या संतापजनक घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. बाळासाहेबांच्या अस्मितेवर झालेल्या या आघाताविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यभर आक्रमक पवित्रा घेत निषेध आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. याचाच भाग म्हणून १९ नोव्हेम्बर रोजी चंद्रपुरात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक निषेध आंदोलन करण्यात आले. (चंद्रपूर पोलिसांची गुन्हेगाराविरुद्ध मोहीम, वाचा सविस्तर)
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी, चंद्रपूर युवासेना आंदोलन
मुंबईत आयोजित शिंदे गटाच्या पत्रकार परिषदेत शायना एनसी यांनी सर्वांसमोर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडून तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याचा आणि आमच्या दैवताचा अवमान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ज्या बाळासाहेबांच्या नावावर हे सत्ता आणि राजकारण उपभोगत आहेत, त्याच बाळासाहेबांचा असा जाहीर अपमान करणाऱ्या गटातील प्रवक्त्याला लाज वाटली पाहिजे, असा घणाघाती हल्लाबोल विक्रांत सहारे यांनी केला. बाळासाहेबांचा हा अवमान कदापि सहन केला जाणार नाही; शायना एनसी यांनी तत्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा थेट इशाराही सहारे यांनी दिला. आंदोलनादरम्यान संतप्त शिवसैनिकांनी शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला तीव्र संताप व निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात युवासेना सहसचिव तथा युवतीसेना चंद्रपूर जिल्हाधिकारी रोहिणी ताई पाटील, शिवसेना शिक्षक सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश नायडू, भारतीय कामगार कंत्राटी सेना जिल्हाध्यक्ष अमोल मेश्राम, युवासेना उपजिल्हाप्रमुख यशपाल कमटम, युवासेना तालुकाप्रमुख सागर गबने, युवासेना शहर प्रमुख तथा उपशहर प्रमुख फरदीन शेख, युवासेना उपशहर प्रमुख राजकुमार पाचभाई, राहुल समुद, निलेश साव, अभिषेक गायकवाड, निखिल मोहरले, अनुष खोब्रागडे, धम्मदीप खोब्रागडे,
ओम कोपुलवार, भारत मंगाम, चेतन जिराफे, पराग कूत्तरमारे, अनुराग गजघाटे, राज खरोले, अनुप इंदुरवार, तन्मय राऊत, शुभम सहारे, सूर्यकांत भावने, अमर चित्तागवार, आयुष सहारे, कुणाल सहारे, जय अडेल, शुभम भीमनवार, संकेत तावडे, रुपेश धनराज, खुशाल खुदमेतगे, प्रतीक मेश्राम, पवन उडाखे, ऋषि बडगी, क्रिस असरते, सोमैया विश्वकर्मा, क्रिश, प्रथम वनधारे, रोशन परोधी, अभिजीत मेश्राम, अतुल मिश्रा आणि अफ़रीद शेख आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा घोर अपमान; शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारत चंद्रपुरात शिवसेनेचा (उबाठा) रुद्रावतार”