चंद्रपूर – (Chandrapur Yuva Sena Protest) चंद्रपुरात युवासेनेच्या वतीने गद्दार खासदारांविरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. भर पावसात सुरू असलेल्या आंदोलनात खासदारांच्या प्रतिमांवर जोडेमार करण्यात आला. (कार ची काच फोडली आणि घडलं धक्कादायक)
वर्ष २०२२ मध्ये 40 आमदारांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी करीत सत्ताधारी भाजपच्या दावणीला जाऊन बसले होते, आता ४ वर्षांनी उद्धव ठाकरे यांच्या मुळे खासदार म्हणून निवडून आलेल्या 6 खासदारांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी करीत शिंदेसेनेत सामील झाले.
Chandrapur Yuva Sena Protest नेमके का झाले?
गद्दार खासदार यांनी मतदारांच्या विश्वासाचा अपमान केला आहे. शिवसैनिक अश्या गद्दार खासदार विरोधात शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिली. चंद्रपुरात गद्दार खासदार विरोधातील निषेध आंदोलनात सहारे बोलत होते.
6 खासदारांनी 50 खोक्याच्या लोभापायी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली, या विरोधात आज युवासेना चंद्रपूर तर्फे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे करण्यात आले.
आंदोलनात गद्दार खासदार विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली, भर पावसात सुरु असलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी गद्दार गद्दार च्या नारेबाजी केली. विक्रांत सहारे यांनी यावेळी ६ खासदारांच्या प्रतिमेवर जोड्यांचा मारा केला.
6 गद्दार खासदार पैकी एकही खासदार चंद्रपूर जिल्ह्यात आला तर त्याच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, शिवसैनिक आता पेटून उठला आहे. आता गद्दारांना माफी नाही अशी जळजळीत प्रतिक्रिया सहारे यांनी दिली.
आंदोलनात युवासेना जिल्हा चिटणीस सुमित अग्रवाल बाळू भगत युवासेना उपजिल्हाप्रमुख यशपाल उर्फ बंटी कमटम माजी तालुका प्रमुख प्रशांत भाऊ गट्टूरवार युवासेना तालुकाप्रमुख महेश श्रीगिरवार विवान रामटेके तालुका समन्वयक सागर गबने असंख्य युवासैनिकांची उपस्थिती होती.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






