Warora Cash Theft कारची काच फोडून ४ लाखांची रोकड चोरी

वरोऱ्यात गाडीची काच फुटली, पण पुढे जे घडलं ते धक्कादायक!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 24, 2026

वरोरा – Warora Cash Theft प्रकरणामुळे वरोरा शहरात खळबळ उडाली आहे. मोकाशे लेआऊट परिसरात उभी असलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे भरदिवसा चारचाकी वाहनाची काच फोडून तब्बल ४ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५(c) आणि ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (घरात सापडला ५ किलो गांजा, चिमूर पोलिसांची कारवाई)

Warora Cash Theft प्रकरणाची संपूर्ण माहिती

वरोरा येथील साकार नगर रहिवासी आणि व्यावसायिक सुधाकर तुळशीराम रोहनकर (वय ५० वर्ष) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या अधिकृत तक्रारीनुसार, ही घटना सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी सकाळी ११:४० ते दुपारी ०१:३० वाजताच्या दरम्यान मोकाशे लेआऊट येथील त्यांच्या ऑफिससमोर घडली. फिर्यादी सुधाकर रोहनकर यांचा भटाळी परिसरात शेतीचा आणि नंदोरी येथे गिट्टी क्रेशरचा व्यवसाय आहे. २२ जून रोजी सकाळी १०:४५ वाजता त्यांनी वरोरा येथील गांधी उद्यानासमोरील मेहर ट्रेडिंग कंपनीचे श्री. जोगी यांच्याकडून कामासाठी २ लाख रुपये घेतले.

त्यानंतर बँकेतून अधिक रक्कम काढायची असल्याने ते स्वतःच्या रेनॉल्ट कॅप्चर चारचाकी वाहनाने (क्रमांक MH 34 BG 9494) यात्रा वार्ड येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेले. तेथे त्यांनी बँकेतून ५ लाख रुपयांची रोकड काढली. अशा प्रकारे मेहर ट्रेडिंग कंपनीकडून घेतलेले २ लाख आणि बँकेतून काढलेले ५ लाख असे एकूण ९ लाख रुपये त्यांनी एका खाकी रंगाच्या पिशवीत ठेवले आणि गाडी चालवत बोर्डा चौकाजवळील मोकाशे लेआऊट येथील आपल्या ऑफिससमोर आले. (भाड्याच्या घरात लपविला सुगंधित तंबाखू, एलसीबी ची धाड)

ऑफिससमोर गाडी उभी केल्यानंतर, सकाळी ११:४० वाजताच्या सुमारास रोहनकर हे त्यांचे मित्र दीपक खवानी यांच्या दुसऱ्या चारचाकी वाहनाने काही कामासाठी चंद्रपूरला जाण्यास निघाले. चंद्रपूरला जाताना त्यांनी ९ लाख रुपयांपैकी ५ लाख रुपये स्वतःसोबत घेतले आणि उर्वरित ४ लाख रुपये आपल्या गाडीच्या मागील डाव्या बाजूच्या सीटखाली ठेवून गाडी लॉक केली. ते दुपारी १:३० वाजताच्या सुमारास पडोली जवळ पोहोचले असता, त्यांचा मुलगा लोकेश याने फोन करून माहिती दिली की ऑफिसबाहेर उभ्या असलेल्या गाडीच्या मागील डाव्या बाजूच्या खिडकीची काच फुटलेली आहे. रोहनकर यांनी मुलाला तात्काळ व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. व्हिडिओ कॉलवर गाडीतील इतर सामान जागेवरच दिसले, परंतु ४ लाख रुपयांची रोकड असलेली खाकी रंगाची पिशवी गायब होती.

संध्याकाळी ४:३० वाजताच्या सुमारास सुधाकर रोहनकर यांनी चंद्रपूरवरून परत येत घटनास्थळाची पाहणी केली असता, अज्ञात चोरट्याने गाडीची काच फोडून आतील ४ लाख रुपयांची नगदी रक्कम चोरून नेल्याची खात्री पटली. या घटनेनंतर त्यांनी थेट वरोरा पोलीस स्टेशन गाठून तोंडी तक्रार नोंदवली. वरोरा पोलिसांनी २२ जून २०२६ रोजी रात्री २०:४० वाजता गुन्हा दाखल केला असून ठाणे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश शामराव सोंटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य अनिल पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment