Chimur Ganja Seizure police raid in Chandrapur district

चिमूरच्या घरात काय सापडले? पोलिसही चक्रावले

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 23, 2026

चिमूर : (Chimur Ganja Seizure) प्रकरणामुळे चिमूर परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुदेव वार्ड येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ५ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ५५ हजार रुपये आहे. या प्रकरणी आरोपी आशिष शामराव माटेटवार याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. (बँकेत येणाऱ्या ग्राहकाच्या पैश्याची थैली गायब करणाऱ्या टोळीला अटक)

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर परिसरात अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर चिमूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका सराईत गुन्हेगाराने राहत्या घरात मोठ्या प्रमाणावर गांजाचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून ५ किलो ५०० ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची अंदाजे किंमत ५५,००0 रुपये असून, या प्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

Chimur Ganja Seizure: पोलिसांना माहिती कशी मिळाली?

राहत्या घरातून मुद्देमाल जप्त पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून २०२६ रोजी चिमूर पोलीस स्टेशनच्या अंमलदारांना एका गोपनीय बातमीदाराकडून विश्वासू माहिती मिळाली. चिमूर येथील गुरुदेव वार्ड रहिवासी असलेला सराईत गुन्हेगार आशिष शामराव माटेटवार याने स्वतःच्या घरात विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर गांजाचा साठा आणून लपवून ठेवला आहे. माहितीची गांभीर्य लक्षात घेता, चिमूर पोलिसांनी तात्काळ या संदर्भातील माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली.

वरिष्ठांकडून गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अंतर्गत छाप्याची रीतसर परवानगी मिळवण्यात आली. त्यानंतर दोन शासकीय पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी संशयित आरोपी आशिष माटेटवार याच्या राहत्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता एका खोलीमध्ये प्लास्टिकच्या नायलॉन चुगळीत ५ किलो ५०० ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सदर ५५ हजार रुपयांचा गांजा जप्त केला.

गुन्हा दाखल व अटक याप्रकरणी आरोपी आशिष शामराव माटेटवार (रा. गुरुदेव वार्ड, चिमूर) याच्याविरुद्ध चिमूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५४०/२०२६, कलम ८ (सी), २० (ब) एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अमली पदार्थांच्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई सदर धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, तसेच वरोराचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत चिमूरचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, पोलीस हवालदार सचिन सायंकार, पोलीस अंमलदार सचिन खामनकर, रोहित तुमसरे, गणेश वाघ, महिला पोलीस अंमलदार स्वाती जोगी, स्मिता आस्कर आणि चालक पोलीस हवालदार अमोल नन्नावरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र वंजारी करीत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment