ब्रह्मपुरी : Brahmapuri Police Theft Case चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात बँक ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी अत्यंत नाट्यमयरित्या पर्दाफाश केला आहे. या खळबळजनक (Brahmapuri Police Theft Case) प्रकरणाची माहिती अशी की, फिर्यादी रामचंद्र सखाराम मोहुर्ले यांनी बँकेतून काढलेले ३० हजार रुपये चोरांनी सेतू केंद्राबाहेरून हातोहात लंपास केले होते. या घटनेची तक्रार मिळताच ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ २४ तासांच्या आत अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत परराज्यातील सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (सोनं गहाण ठेवले, परताव्याची आशा मात्र झाली फसवणूक)
बँकेतून किंवा शासकीय कार्यालयातून काम करून बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे लक्ष विचलित करून पैशांची थैली पळवणाऱ्या एका अत्यंत धोकादायक आंतरराज्य टोळीचा ब्रह्मपुरी पोलिसांनी छडा लावला आहे. या टोळीतील सराईत गुन्हेगारांना अत्यंत कौशल्याने २४ तासांच्या आत जेरबंद करण्यात आले आहे.
Brahmapuri Police Theft Case: सेतू केंद्राबाहेर नेमकी काय घडली घटना?
सेतू केंद्राबाहेर घडला थरार मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र सखाराम मोहुर्ले (रा. अड्याळ जॉनी, ता. ब्रह्मपुरी) हे दि. २२ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास स्थानिक सि.डी.सी.सी. बँक, ब्रह्मपुरी येथून ३०,००० रुपयांची रोकड काढून बाहेर पडले होते. ते ही रक्कम एका कापडी थैलीत ठेवून मुलीच्या कॉस्ट सर्टिफिकेटचे (जात प्रमाणपत्र) काम करण्यासाठी तहसील कार्यालय ब्रह्मपुरी येथील सेतू केंद्र येथे गेले होते. सेतू केंद्रात काम करत असताना त्यांनी पैशांची थैली काही वेळासाठी बाजूला ठेवली.
लक्ष विचलित करून ठोकली होती लाथ तेवढ्यात पाठीमागून आलेल्या अज्ञात चोराने रामचंद्र यांना आवाज दिला. त्यांनी मागे वळून पाहिले असता तिथे कोणीच नव्हते. मात्र, जेव्हा त्यांनी पुन्हा बाजूला पाहिले तेव्हा त्यांची पैशांनी भरलेली कापडी पिशवी तिथून गायब झाली होती. आजूबाजूला आरडाओरड करून शोध घेतला असता पिशवी मिळून आली नाही. अखेर बँकेबाहेर पाळत ठेवून लूट करणाऱ्या टोळीने आपला हात साफ केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांची या (Brahmapuri Police Theft Case) अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४०/२०२६ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिसांची चक्रे फिरली; २४ तासांत आरोपी गजाआड गुन्हा दाखल होताच ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाची (DB Team) विशेष टीम तयार करण्यात आली. या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध मोहीम राबवली. अत्यंत शिताफीने तपास करत पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत परराज्यातील या आंतरराज्य टोळीच्या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांची कसून झडती घेतली असता, गुन्ह्यात चोरीस गेलेले ३० हजार रुपये, फिर्यादीचे बँक पासबुक आणि चोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल (मोसा) हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या पथकाने बजावली कामगिरी सदरची उत्कृष्ट कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनकर ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे (बकल नं २५५२, जे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत), पोलीस अंमलदार प्रविण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ट रंगारी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. पोलिसांच्या या कामगिरीचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






