Ghugghus Wire Theft प्रकरणात चार आरोपी अटकेत

“1600 मीटर वीज तार चोरी करून पळाले… पण 24 तासांत पोलिसांनी ट्रॅक्टरसह पकडले!”

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 19, 2026

घुग्घूस: Ghugghus Wire Theft प्रकरणाचा घुग्घूस पोलिसांनी अवघ्या 24 तासांत यशस्वी तपास करत पर्दाफाश केला आहे. शिदूर शेतशिवारातील महावितरणच्या वीज खांबांवरील मौल्यवान ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या चार सराईत आरोपींना पोलिसांनी रंगेहात अटक केली. आरोपींकडून ट्रॅक्टर, मोटारसायकली, गॅस सिलेंडर, कटर आणि चोरीचा माल असा एकूण 2 लाख 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील चोरट्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (किराणा दुकानात सुरु होता सुगंधित तंबाखू विक्रीचा व्यवसाय)

शेतशिवारातील वीज खांबांवरून महावितरणच्या मौल्यवान ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात घुग्घूस पोलिसांना अवघ्या २४ तासांत मोठे यश आले आहे. मौजा शिदूर शेतशिवारातून वीज तारा कापून लंपास करणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी ट्रॅक्टर, मोटारसायकली, गॅस सिलेंडर आणि कटरसह रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून एकूण २ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Ghugghus Wire Theft प्रकरणाचा 24 तासांत पर्दाफाश

या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, कोसारा येथील रहिवासी आणि महावितरणचे सहाय्यक अभियंता नयन पांडुरंग भटकर यांनी १८ जून रोजी घुग्घूस पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, १७ जूनच्या मध्यरात्री १:०० ते पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी मौजा शिदूर शेतशिवारातील वीज खांबांवरून ५५ हजार रुपये किमतीची १६०० मीटर लांबीची विद्युत ॲल्युमिनियम तार कापून चोरून नेली होती. या तक्रारीवरून घुग्घूस पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून प्रभारी पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांनी तात्काळ गुन्हे शोध पथक तैनात करून चोरटा व माल शोधण्याचे आदेश दिले. (घुग्गुस मध्ये सुगंधित तंबाखूचा साठा जप्त)

तपासादरम्यान गुप्त बातमीदार आणि तांत्रिक यंत्रणेच्या साहाय्याने पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली की, धानोरा फाटा ते धानोरा गावाकडे जाणाऱ्या रोडवरील झाडीझुडपात एक संशयित ट्रॅक्टर उभा आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून सापळा रचला आणि तिथे उपस्थित संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी शिदूर शिवारातून तार चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात पोलिसांनी चंद्रपूर येथील रहिवासी असलेले शेख आशिक शेख रशीद, तौसीब शेख फिरोज शेख, साजिद शेख नासिर शेख आणि नाझीर शेख मजीद शेख या चारही आरोपींना अटक केली आहे.

आरोपींकडून ५५ हजार रुपयांची ॲल्युमिनियम तार, १ लाख ५० हजार रुपये किमतीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली, एक लाल-काळ्या रंगाची हिरो सीडी-डिलक्स मोटारसायकल, एक विना क्रमांकाची प्लेटिना मोटारसायकल, तार कापण्यासाठी वापरण्यात येणारे दोन ऑक्सिजन सिलेंडर, एक लहान गॅस सिलेंडर, लोखंडी सबबल, घन, सिलेंडर पाईप, लोखंडी कैची आणि पाना असा एकूण २ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई घुग्घूसचे पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल डाहुले, गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार संजय आतकुलवार, अनिल बैठा, विशाल हूड, राकेश तुरणकर, तसेच पोलीस अंमलदार नितीन मराठे, रवींद्र वाबीटकर, महेश भोयर, प्रसन्नजीत डोरलीकर आणि पवन डाखरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरतील चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment