chandrapur ganja bust

चंद्रपुरात घरातून सुरू होती गांजाची विक्री; बेडखाली लपवलेला १ किलो गांजा जप्त!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 15, 2026

चंद्रपूर: (chandrapur ganja bust) प्रकरणात चंद्रपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील भिवापूर वार्ड परिसरामध्ये आपल्या राहत्या घरातूनच छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तस्करावर पोलिसांनी धाड टाकली. डी.बी. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात मुख्य आरोपी पांडुरंग बानलवार याला रंगेहात पकडण्यात आले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईत त्याच्या ताब्यातून १ किलोहून अधिक वजनाचा अमली गांजा जप्त करण्यात आला आहे. (घरातून सुरु होती गांजा विक्री, भद्रावती पोलिसांनी केली कारवाई)

chandrapur ganja bust : भिवापूर वार्डात पोलिसांची धडक कारवाई

या धाडसी कारवाईची सविस्तर हकीकत अशी की, १५ जुलै २०२६ रोजी पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे हे आपल्या डी.बी. स्टाफसह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान ते प्रो.व्ही, जुगार रेड आणि कंजम्पशन केसेसची तपासणी करत असतानाच त्यांना एका विश्वसनीय मुखबिराकडून खात्रीशीर खबर मिळाली. चंद्रपूर येथील भिवापूर वार्डात राहणारा पांडुरंग बानलवार हा इसम आपल्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणावर गांजा बाळगून असून तेथूनच तो ग्राहकांना छुप्या पद्धतीने गांजा विकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले.

माहितीची खात्री करून पोलीस पथकाने पंचांना सोबत घेतले आणि भिवापूर वार्ड येथील संशयित पांडुरंग बानलवार याच्या राहत्या घरावर अचानक छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने पंचांसमक्ष त्याच्या घराची कसून झडती घेण्यास सुरुवात केली. घराच्या पहिल्या खोलीमध्ये तपासणी करत असताना बेडच्या खाली लपवून ठेवलेली एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिक पिशवी पोलिसांच्या हाती लागली. सदर पिशवीची तपासणी केली असता, त्यात वाळलेली हिरव्या रंगाची पाने, फुले, देठ आणि बिया असलेली अमली गांजा सदृश्य वनस्पती आढळून आली. पोलिसांनी त्याचे रीतसर वजन केले असता १ किलो १० ग्रॅम वजनाचा हा गांजा मिळून आला, ज्याची बाजारपेठीय अंदाजे किंमत १५ हजार रुपये आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपी पांडुरंग बानलवार याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी पांडुरंग बानलवार विरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(२) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कसून तपास सुरू करण्यात आला आहे. सदरची धडाकेबाज कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. या मोहिमेत सपोनि. राजेंद्र सोनवणे, पोउनि. दत्तात्रय कोलते, पोउनि. विलास निकोडे तसेच डी.बी. पथकातील मपोहवा. भावना रामटेके, पो.हवा. संजय धोटे, जावेद सिद्धीकी, रूपेश रणदिवे, संतोष दंडेवार, संतोष कनकम, नापोअं. कपुरचंद खरवार, पो.अं. रूपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, सुशांत थिवे, प्रफुल भैंसारे आणि दीपीका झिंगरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment