गडचांदूर : (bakhardi farmer electricity issue) मुळे गडचांदूर परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. मौजा बाखर्डी येथील शेतकरी सुरेश उद्धव पानघाटे यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. आधीच महावितरणने ऐन हंगामात वीज पुरवठा सुरू केला नव्हता. त्यातच २९ जून रोजी शेतातील ५ पोलवरील संपूर्ण वायर चोरीला गेली. यामुळे वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. शेतकऱ्याचे शेती नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
bakhardi farmer electricity issue : शेतातील वीज पुरवठा १५ वर्षांनंतर अचानक खंडित
मौजा बाखर्डी येथील शेतकरी श्री. सुरेश उद्धव पानघाटे यांच्या सर्वे क्र. 109/1, 109/2 व 109/3 या शेताला मागील 15 वर्षांपासून महावितरणकडून विद्युत पुरवठा होत आहे. मात्र यावर्षी उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर वारंवार विनंती करूनही तो सुरू करण्यात आलेला नाही.
श्री. पानघाटे यांनी दि. 17 जून 2026 रोजी महावितरणकडे मिरची लागवडीसाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरू करण्याची लेखी विनंती केली होती. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने वेळेत सिंचन करता आले नाही आणि मिरची लागवडीचे नियोजनच रद्द करावे लागले.
त्यातच दि. 29 जून 2026 रोजी शेताकडे जाणाऱ्या पाच विद्युत पोलवरील संपूर्ण वायरिंग चोरीला गेली. त्यामुळे शेताचा वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. एकीकडे पावसाने दांडी मारल्यामुळे पिके संकटात आली आहेत, तर दुसरीकडे वीज नसल्याने सिंचन करणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्याचे संपूर्ण शेती नियोजन कोलमडले आहे.
याप्रकरणी श्री. सुरेश पानघाटे यांनी महावितरणकडे तात्काळ चोरीस गेलेली वायरिंग बसवून विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा होणाऱ्या सर्व आर्थिक नुकसानीस महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (ही बातमी वाचा – डीजे च्या मुद्द्यावर आमदार जोरगेवार यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट)
स्थानिक शेतकऱ्यांमध्ये या प्रकारामुळे तीव्र नाराजी असून, प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






