Gadchandur Ganja Seized प्रकरणातील पोलिसांची कारवाई

गडचांदुरमध्ये घरावर पोलिसांचा छापा; ८४६ ग्रॅम गांजा जप्त, महिलेवर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 16, 2026

गडचांदुर: Gadchandur Ganja Seized प्रकरणात गडचांदुर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भंडारी कॉलनीतील एका घरावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ८४६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त गांजाची किंमत सुमारे ४२ हजार ३०० रुपये आहे. पोलिसांनी नमिता विवेकानंद बिस्वास या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा विक्रीसाठी घरात ठेवण्यात आला होता. कारवाईनंतर पुढील तपास सुरू आहे. प्रकरणात NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गडचांदुरमध्ये पोलिसांचा घरावर छापा

कोरपना तालुक्यातील गडचांदुर येथे राहत्या घरातून गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेच्या घरावर पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा टाकून सुमारे ४२ हजार ३०० रुपयांचा ८४६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी नमिता विवेकानंद बिस्वास (वय ३७ वर्षे, रा. भंडारी कॉलनी, वार्ड क्र. ४, गडचांदुर) या महिलेविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला केले डिजिटल अरेस्ट, ६३ लाख लुटले)

Gadchandur Ganja Seized प्रकरणात ८४६ ग्रॅम गांजा जप्त

गडचांदुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश राजेंद्र अनभुले यांना मंगळवारी दुपारी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, भंडारी कॉलनी परिसरातील नमिता बिस्वास ही महिला स्वतःच्या घरात गांजा हा अंमली पदार्थ बाळगून त्याची चोरटी विक्री करत आहे. माहितीची खात्री पटल्यानंतर लागलीच ठाणे दैनंदिनीत नोंद घेऊन पोलीस निरीक्षक शिवाजी कदम व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना लेखी अहवाल देण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे दोन शासकीय पंच, वजनमाप तज्ज्ञ आणि छायाचित्रकाराला पाचारण करण्यात आले. तसेच पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या उपस्थितीत आणि महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड यांच्यासह पथकाने दुपारी भंडारी कॉलनीतील संबंधित घराची घेराबंदी केली.

भंडारी कॉलनीतील घरातून गांजा सापडला

घटनास्थळी उपस्थित असलेल्या संशयित महिला नमिता बिस्वास हिला एनडीपीएस कायद्याच्या कलम ५० नुसार झडतीबाबत कायदेशीर नोटीस देण्यात आली. त्यानंतर पंचांसमक्ष तिच्या घराची कसून तपासणी केली असता, बेडरूममधील पलंगाखाली एका पांढऱ्या पिशवीत लपवून ठेवलेला गांजासदृश अंमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागला. प्राथमिक चौकशीत हा पदार्थ विक्रीसाठी आणल्याची कबुली संबंधित महिलेने दिली. वजनमाप तज्ज्ञांकडून इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजणी केली असता, पांढऱ्या रंगाच्या पिशवीत हिरवट रंगाची पाने, फुले आणि बोंडे असलेला एकूण ८४६ ग्रॅम वजनाचा आणि सुमारे ४२ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा आढळून आला.

पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत रासायनिक विश्लेषणासाठी २४-२४ ग्रॅमचे दोन स्वतंत्र नमुने सीलबंद केले असून, उर्वरित ७९६ ग्रॅम गांजा पंचांसमक्ष सील करून जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश अनभुले यांच्या फिर्यादीवरून गडचांदुर पोलीस ठाण्यात आरोपी नमिता बिस्वास हिच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment