Chandrapur Polio Campaign vaccination drive for children

चंद्रपूरात 28 जूनला पल्स पोलिओ मोहीम; 33 हजारांहून अधिक बालकांना डोस देणार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 24, 2026

चंद्रपूर : Chandrapur Polio Campaign अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 33,128 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजले जाणार आहेत. शहरात 152 बुथ, 20 मोबाईल पथके आणि 31 ट्रान्झिट पथके कार्यरत राहणार आहेत. सर्व पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ बुथवर घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (चंद्रपूर जिल्ह्यातील ८६ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण – जिल्हाधिकारी पंत)

पोलिओ रोगाचे संपूर्ण निर्मूलन करण्याच्या  उद्देशाने भारतात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. जानेवारी २०११ पासून भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नसल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO – South-East Asia Region) वतीने भारताला दिनांक २७ मार्च २०१४ रोजी पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. तथापि, संपूर्ण जगातून पोलिओचे निर्मूलन होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

Chandrapur Polio Campaign अंतर्गत किती बालकांचे लक्ष्य?


यावर्षी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी राबविण्यात येणार असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मा. आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ११ जून २०२६ रोजी सिटी टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. (महिला सुरक्षेसाठी प्रशासनाची धडक मोहीम)


या मोहिमेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात शाळा, समाजमंदिरे, अंगणवाड्या, दवाखाने आदी ठिकाणी एकूण १५२ तात्पुरती लसीकरण केंद्रे (बुथ) स्थापन करण्यात येणार आहेत. या बुथची वेळ सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत राहणार आहे.
प्रवासात असलेली, स्थलांतरित तसेच निवासाची व्यवस्था नसलेली बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी २० मोबाईल पथके कार्यरत राहणार आहेत. तसेच बसस्थानक, रेल्वे स्थानक, मेळावे आदी गर्दीच्या ठिकाणी ३१ ट्रान्झिट पथकांमार्फत पोलिओ लसीकरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.


या मोहिमेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ३३,१२८ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पालकांनी आपल्या बालकाला यापूर्वी पोलिओचा डोस दिलेला असला तरी, बालक किरकोळ आजारी असले तरी किंवा नुकतेच जन्मलेले असले तरीही त्याला पोलिओचे दोन थेंब पाजणे अत्यंत आवश्यक आहे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे गरजेचे आहे.


तरी चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना दिनांक २८ जून २०२६ रोजी जवळच्या पोलिओ बुथवर घेऊन जाऊन पोलिओ लसीचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment