चंद्रपूर : कुलदीप गोंड पुरस्कार हा चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. गोंडवाना विद्यापीठाचा पहिला ‘उत्कृष्ट शारीरिक शिक्षण निर्देशक पुरस्कार’ डॉ. कुलदीप राजकिशोर गोंड यांना प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला. शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. (आमदाराच्या फेसबुक पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट, वाचा हि बातमी)
डॉ. गोंड हे महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रमुख आहेत. क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि खेळाडूंना मार्गदर्शन या कार्याची दखल घेण्यात आली.
कुलदीप गोंड पुरस्कार: कोणत्या कार्याची दखल?
डॉ. गोंड यांनी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गोंडवाना विद्यापीठाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. विविध विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना मार्गदर्शन, क्रीडा प्रशिक्षण, निवड चाचण्या तसेच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख अतिथी लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ, नागपूरचे डॉ. अतुल वैद्य, विशेष अतिथी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी श्री अविश्यांत पंडा, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांच्याहस्ते शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन डॉ. कुलदीप राजकिशोर गोंड यांचा गौरविण्यात आले.
डॉ. कुलदीप गोंड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
या पुरस्कारामुळे सरदार पटेल महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, महाविद्यालयाच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.
गोंडवाना विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट शारीरिक शिक्षण निर्देशक पुरस्कार’ मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. या पुरस्काराचे खरे श्रेय माझ्या आई-वडिलांना, ज्यांनी आयुष्यभर दिलेले संस्कार, आशीर्वाद आणि प्रेरणा माझ्या वाटचालीची ताकद ठरली; माझी पत्नी, मुले आणि परिवारातील सर्व सदस्य, ज्यांनी प्रत्येक टप्प्यावर प्रेम, सहकार्य आणि पाठबळ दिले; तसेच माझे मित्र आणि सहकारी, ज्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिलेल्या त्या सर्वांना जाते. विशेषतः माझे गुरु, मार्गदर्शक आणि सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. प्रमोद एम. काटकर सर यांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या मार्गदर्शनाने, विश्वासाने आणि प्रेरणेने माझ्या कार्याला योग्य दिशा मिळाली. त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास हीच माझ्यासाठी मोठी प्रेरणाशक्ती आहे अशी प्रतिक्रिया डॉ.गोंड यांनी दिली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






