वरोरा (चंद्रपूर): (करण देवतळे फेसबुक पोस्ट) आमदार करण देवतळे यांच्या अधिकृत फेसबुक पोस्टवर आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक टिप्पणी करणाऱ्या ‘बजरंग माळी’ नावाच्या खातेदारावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पक्षाचे वरोरा शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष सुरेश पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी वरोरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना एक औपचारिक निवेदन सादर केले आहे. (विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू, वाचा हि बातमी)
करण देवतळे फेसबुक पोस्ट: भाजपचे वरोरा पोलिसांना निवेदन
पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनानुसार, आमदार करण देवतळे यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरील पोस्टवर ‘बजरंग माळी’ या फेसबुक प्रोफाइलवरून अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद मजकूर कमेंट करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे आमदारांची वैयक्तिक तसेच सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिमा मलिन करण्याचा आणि त्यांच्या प्रतिष्ठेला जाणीवपूर्वक धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून हा प्रकार हेतुपुरस्सर घडवून आणला गेला असल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
डिजिटल पुरावे आणि Meta कडून माहिती मागवण्याची विनंती
याप्रकरणी पोलिसांनी संबंधित फेसबुक खातेधारकाचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कडक कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतोष पवार यांनी केली आहे. तसेच संबंधित आक्षेपार्ह कमेंट आणि पोस्टचे डिजिटल पुरावे जतन करून फेसबुक/मेटा (Meta) कंपनीकडून आवश्यक ती तांत्रिक माहिती मागवण्यात यावी, जेणेकरून संशयित बजरंग माळी याच्या खात्याची अचूक ओळख पटवून कारवाई करणे सुलभ होईल. याशिवाय असा वादग्रस्त मजकूर पुढे इतरत्र प्रसारित होऊ नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक पावले उचलावीत आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईची अधिकृत माहिती निवेदकाला द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. या निवेदनासोबत डिजिटल पुराव्यादाखल स्क्रीनशॉट व छायाचित्रे जोडण्यात आली आहेत.
वरोरा पोलीस निरीक्षकांना हे निवेदन सुपूर्द करताना शहराध्यक्ष संतोष पवार यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी दिलीप घोरपडे, जगदीश तोटावार, अमित चवले, अनिकेत नाकाडे, अजिंक्य नरडे, पंकज जाधव, राहुल बांदुरकर, प्रशांत उलमले, सुरज केशवानी, अनिकेत मिन्नलवार, शुभम गोल्हर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






