चंद्रपूर – (Suraj Pande Case Gadchandur) या प्रकरणाने चंद्रपूर जिल्हा पोलीस दलासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. गडचांदूर येथील भाजप नगरसेवक सूरज पांडे यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अवैध धंद्यांविरोधात सतत तक्रारी केल्यामुळे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी सूडबुद्धीने आपल्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा दावा पांडे यांनी केला आहे. यामुळे गडचांदूर पोलिसांच्या एकूण कार्यप्रणालीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मला खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे, अवैध धंद्यांविरोधात सतत तक्रारी केल्याने पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी सूडबुद्धीने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असा खळबळजनक आरोप भाजप नगरसेवक सूरज पांडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
२ दिवसांपूर्वी गडचांदूर पोलिसांनी ३९ वर्षीय महिलेचा विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवक सूरज पांडे वर विविध कलमांव्ये गुन्हा दाखल केला होता, कारण महिलेच्या पतीने ४ वर्षांपूर्वी माझ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता, तर मी त्याच्या घरी कशाला जाणार. पोलिसांनी सूडबुद्धीने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे. (भाजप नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल)
Suraj Pande Case Gadchandur: पोलिसांच्या कारवाईवर गंभीर आक्षेप
नगरसेवक होण्यापूर्वी पांडे वर दारूबंदी काळात दारूविक्रीचे अनेक गुन्हे दाखल झाले होते, त्यानंतर दारूविक्री बंद करीत ठेकेदाराकडे पांडे काम करू लागले, या दरम्यान त्यांनी सामाजिक कार्यात रस घेत राजकारणात आपलं नशीब आजमावलं, गडचांदूर नगरपरिषदेत पांडे यांना भाजप ने तिकीट देत नगरसेवक बनविले.
गडचांदूर शहरात अनेक अवैध धंदे, गो तस्करी सुरु होते, त्याची मी सतत पोलिसांना तक्रार करायचो मात्र पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखल न घेता पोलीस निरीक्षक कदम हे उलट मलाच उलट सुलट बोलून तुला आत टाकतो असे म्हणायचे.
विनयभंग प्रकरणातील फिर्यादी महिलेच्या पतीने बनावट चारित्र्य प्रमाणपत्र तयार करीत सिमेंट कंपनी मध्ये नोकरी मिळवली, मी त्याची तक्रार केली होती, त्याबाबत महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल झाला होता. म्हणून महिला व त्यांच्या पतीच्या मनात माझ्याविषयी द्वेषभावना निर्माण झाली होती. या सर्व बाबीची माहिती पोलीस निरीक्षक कदम यांना होती. त्यामुळे महिला व तिच्या पतीला हाताशी धरत माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला.
घटनेच्या दिवशी मी घरी असताना मला महिलेच्या पतीचा कॉल आला, मला त्याने घरी बोलविले मात्र तुझ्याशी माझा काही संबंध नाही म्हणालो असता त्याने मला शिवीगाळी करणे सुरु केले, मी हि बाब पोलीस निरीक्षक कदम यांना सांगितली, त्यांनी तक्रार द्यायला सांगितली असता मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिली. त्यानंतर काही वेळाने माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा पोलिसांनी पूर्वनियोजित कट रचून दाखल केला असल्याचा आरोप नगरसेवक पांडे यांनी केला आहे. पांडे यांच्या आरोपामुळे गडचांदूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेष बाब म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी अवैध धंद्यावर धडक कारवाईची मोहीम राबवली आहे, त्यानंतर सुद्धा गडचांदूरात अवैध धंदे जोमात सुरु आहे, सट्टा पट्टी, असो कि जुगार हे सरार्सपणे खेळल्या जात आहे, यावर गडचांदूर पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. भाजप नगरसेवकाच्या आरोपामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात पोलिसांना न्यायालयात पुरावा सादर करण्याचे आव्हान आहे. पांडे यांनी विनयभंग गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली व गडचांदूर पोलिसांची पोलीस महानिरीक्षकाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेवक पांडे यांनी दिली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






