गडचांदूर – चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात (Gadchandur Suraj Pande Case) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ६ जुलै रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास एका ३९ वर्षीय महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यात आला. त्यानंतर पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी गडचांदूर शहरातील भाजप नगरसेवक सूरज पांडे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. (हे हि वाचा – दुकानात शिरून बाहेर काढले आणि थेट चाकूने वार)
Gadchandur Suraj Pande Case : नेमकी घटना काय?
६ जुलै रोजी महिला घरी झोपी गेली असताना अचानक दार कुणीतरी जोरात ठोठावले असता, महिला जागी झाली, दार उघडताच नगरसेवक सूरज पांडे हा समोर उभा होता, तुझा नवरा कुठं आहे, त्याने मला शिवीगाळ केली असे म्हणत महिलेला अश्लील शब्दात शिवीगाळ केली. त्याला मी सोडणार नाही असे म्हटल्यावर पांडे यांनी महिलेच्या छातीला स्पर्श करीत तिला ढकलून घराच्या आत शिरला.
मी नगरसेवक आहे तुला आणि तुझ्या पतीला जीवानिशी ठार मारेल व तुम्हाला खोट्या केस मध्ये अडकविणार अशी धमकी नगरसेवक सूरज पांडे यांनी महिलेला दिली. धमकीला घाबरत महिलेने आरडाओरडा केला असता शेजाऱ्यांनी महिलेच्या घराकडे धाव घेतली. शेजारी येत असल्याची चाहूल लागताच सूरज पांडे पळून गेला.
महिला व मुले रात्रीच्या सुमारास घरी झोपून होत्या, पती त्यावेळी कामानिमित्त बाहेर होते, अश्या वेळेस महिलेचा एकांताचा फायदा घेत नगरसेवक महिलेच्या घरी घुसत अश्लील शब्दात शिवीगाळ व महिलेच्या छातीला स्पर्श करीत तिला ढकलले, याप्रकरणी महिलेने तात्काळ गडचांदूर पोलीस ठाण्यात धाव घेत नगरसेवक पांडे विरोधात तक्रार दिली.
गडचांदूर पोलिसांनी भाजप नगरसेवक सूरज पांडे विरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता २०२३ कलम ७४, ७९, ३२९ (३) व ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






