Suraj Pedulwar PhD awarded by Gondwana University

Suraj Pedulwar PhD; राजकारणातील सूरज झाला डॉक्टर

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 6, 2026

चंद्रपूर – Suraj Pedulwar PhD ही चंद्रपूरसाठी अभिमानाची बातमी ठरली आहे. युवा सामाजिक व राजकीय कार्यकर्ते सूरज पेदुलवार यांना गोंडवाना विद्यापीठाकडून बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष सत्कार करून कौतुक केले. सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळत संशोधन पूर्ण करणाऱ्या सूरज पेदुलवार यांच्या यशाची सर्वत्र चर्चा होत आहे. (कमी वयात व्यवसाय, आता मिळाले बळ)

Suraj Pedulwar PhD यांना पीएचडी पदवी जाहीर


मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सूरज पेदुलवार यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सूरज यांनी सार्वजनिक जीवनातील व्यस्तता आणि राजकीय जबाबदाऱ्या सांभाळून संशोधन कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले, याबद्दल भाऊंनी त्यांचे कौतुक केले. राजकारणात अशा सुशिक्षित आणि अभ्यासू तरुणांची नितांत गरज असून सूरज यांचा प्रवास इतर युवा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत भाऊंनी व्यक्त केले. सूरज यांनी मा.आ. सुधीरभाऊंना आपले राजकीय गुरू मानून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली समाजकारणाची धुरा सांभाळली आहे.


संशोधनाचा विषय आणि शैक्षणिक गुरुंचे मार्गदर्शन
सूरज पेदुलवार यांनी “चंद्रपूर जिल्ह्यातील लघु उद्योगांच्या संदर्भात कर्मचारी आणि संस्थांच्या कार्यक्षमतेवर प्रशिक्षण आणि विकासाचा परिणाम” या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला. त्यांच्या या खडतर आणि प्रदीर्घ संशोधनात त्यांना अनेक दिग्गजांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


त्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. नियाज शेख सर यांनी त्यांना संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर तांत्रिक आणि वैचारिक दिशा दिली. तसेच सौ.लीना किशोर मामीडवार इन्स्टिट्युट ॲाफ मॅनेजमेंट स्टडीज ॲड रिसर्च कॉलेजचे प्राचार्य डॅा.चक्रवर्ती सर आणि विषयतज्ज्ञ डॉ. आर. पी. इंगोले सर यांनी सूरज यांच्या या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शैक्षणिक शिखर गाठता आल्याचे सूरज यांनी नमूद केले.

सूरज पेदुलवार यांचा शैक्षणिक प्रवास हा राजकारणात येणाऱ्या नवीन युवा पिढीसाठी एक धडा आहे. राजकारण म्हणजे केवळ निवडणुका किंवा प्रचार नव्हे, तर तो अभ्यासू वृत्तीने केलेला समाजकारणाचा एक भाग आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. स्वतः विद्याविभूषित राहून समाजकारण आणि राजकारणाचा सुंदर समन्वय कसा साधता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.


या यशाचे श्रेय सूरज यांनी आपले आई-वडील, बहीण, जावई आणि संपूर्ण पेदुलवार कुटुंबाला दिले आहे तसेच  महत्त्वाचे म्हणजे, त्यांची धर्मपत्नी सौ. स्नेहल सूरज पेदुलवार हिची त्यांना वेळोवेळी मिळालेली भक्कम साथ, समजूतदारपणा आणि प्रोत्साहनामुळेच ते हे यश साध्य करू शकले, असे सूरज यांनी आवर्जून सांगितले.


एक युवा कार्यकर्ता ते ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) हा सूरज पेदुलवार यांचा प्रवास त्यांच्या कष्टाची आणि चिकाटीची साक्ष देतो. त्यांच्या या यशाबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment