चंद्रपूर : Dr. Anil Khuje PhD पदवी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विषयात संपादन करून त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. Vikrant University Gwalior PhD येथून त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील त्यांची सातत्यपूर्ण वाटचाल, अभ्यासू वृत्ती व तांत्रिक ज्ञानाची आवड यामुळे त्यांनी हे यश मिळवले. यासोबतच त्यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना (तांत्रिक विभाग), चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. (डायलिसिस केंद्राचे उद्घाटन, वाचा आरोग्याची बातमी)
डॉ. अनिल खुजे पीएचडी: कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विषयात संशोधन
डॉ. अनिल आर. खुजे यांनी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. विक्रांत विद्यापीठ, ग्वालियर येथून त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
शिक्षण क्षेत्रातील त्यांची सातत्यपूर्ण वाटचाल, अभ्यासू वृत्ती, मेहनत आणि तांत्रिक ज्ञानाची आवड यामुळे त्यांनी ही उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, डॉ. अनिल आर. खुजे यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना (तांत्रिक विभाग), चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील तांत्रिक व व्यावसायिक विषयांना चालना देण्यासोबतच शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी ते कार्यरत राहणार आहेत.
पीएच.डी. पदवी आणि शिक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी या दुहेरी यशाबद्दल डॉ. अनिल आर. खुजे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






